चेहऱ्यावरील तीळ आवडत नाही? करा सोपे घरगुती उपाय आणि बघा फरक

चेहऱ्यावर किंवा त्वचेवर तीळ असणे यात काही वेगळे नाही. पण अनेक व्यक्तींना तीळ आवडत नाहीत. त्यामुळे सौंदर्य कमी होते असे त्यांना वाटते.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रfreepik
Published on

चेहऱ्यावर किंवा त्वचेवर तीळ असणे यात काही वेगळे नाही. पण अनेक व्यक्तींना तीळ आवडत नाहीत. त्यामुळे सौंदर्य कमी होते असे त्यांना वाटते. आज आपण तीळ हटवण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

  • दररोज १५ मिनिटे कांद्याचा रस, लसूनची पेस्ट किंवा नारळाच्या तेलाने मालिश केल्यास तीळ हळूहळू गायब होतात. एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते.

  • थोडीशी हळद आणि एक चमचा दही यांचे मिश्रण १५ मिनिटे तीळ असलेल्या ठिकाणी लावून ठेवा

  • अळशी किंवा फ्लेक्ससीडची पेस्ट : ही पेस्ट आठवड्यातून तीन ते चार वेळेस तासाभरासाठी लावावी. अर्धा चमचा अळशीचं तेल आणि मध यांचं मिश्रण करुन ते कापसाच्या मदतीने तीळावर लावा.

  • अननसाचा रस तयार करुन तो हवाबंद डब्यात ठेवा आणि कापसाच्या मदतीने दर दोन तासांनी तीळावर लावा. याशिवाय, अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करुन त्या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्‍यावरील तीळ कमी होण्यास मदत होते.

  • अर्धा कप ॲपल साईडर व्हिनेगर अर्धा कप पाण्यात मिसळा. कापसाद्वारे हे मिश्रण रात्री झोपण्याआधी तीळावर लावा. नंतर सकाळी खोबरेल तेलाने हलकी मसाज करा. काही दिवसांतच फरक जाणवेल.

  • कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हाला नको असलेल्या तिळावर नियमित लावा.

    (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )

logo
marathi.freepressjournal.in