
उन्हाळा सुरू आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अनेक वेळा उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त थकवा निर्माण होतो. तसेच सुस्ती देखील येते. याचा परिणाम कामावर होतो. कामात फारसे मन रमत नाही तसेच उत्साही देखील वाटत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
भरपूर पाणी प्या
उन्हाळा असल्याने अनेक वेळा शरिरात पाणी कमी होत असते. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होते. शरिराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात आवश्यक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. अनेक वेळा आपण थंड पेयाचे सेवन करतो. त्यात पाण्याची मात्रा असली तरी त्यामुळे प्रत्यक्षात आपण कमी पाणी पितो. तसे न करता शरिराला आवश्यक तेवढे पाणी प्यावे.
आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश
आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. फळांमध्ये रसाळ आणि पाणी जास्त असलेली फळे जसे की कलिंगड, खरबूज यांचा समावेश असू द्या. यामुळे शरिराची पाण्याची गरज पूर्ण होते. तसेच फळांमुळे पचनक्रिया सुलभ होऊन पोट जड पडत नाही. त्यामुळे आळस, थकवा दूर होतो. सोबतच यामुळे शरीर थंड देखील राहते.
लांब आणि दीर्घ श्वास घेणे
काम करत असाताना अनेक वेळा आपले आपल्या श्वासाकडे लक्ष जात नाही. त्यामुळे कामातून थोडा ब्रेक घेऊन लांब आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे लगेच आराम मिळतो.
आवश्यक असल्यास इलेक्ट्रोलाइट्स घ्या
उन्हाळ्यात अनेकदा शरीर डिहायड्रेट होते. तसेच कधी कधी इलेक्ट्रोलाइट्सची सुद्धा कमतरता होते. यामुळे देखील मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. अशा वेळी तुम्ही पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स पावडर टाकून ते पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला थोड्या वेळातच उर्जा मिळेल. थकवा दूर होईल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)