Coriander Storage: फ्रिजमध्ये सारखी खराब होते कोथिंबीर? या सोप्या पद्धतीने करा स्टोअर!

Easy Kitchen Tips: कोथिंबीर शिवाय भारतीय पदार्थांना चव येत नाही. कोणत्याही डिशची चव आणखीन वाढवण्यासाठी कोथिंबीर फार महत्त्वाची आहे.
Coriander Storage: फ्रिजमध्ये सारखी खराब होते कोथिंबीर? या सोप्या पद्धतीने करा स्टोअर!
Freepik

Kitchen Tips: हिरवी कोथिंबीर हा भारतीय स्वयंपाक घरातील फार महत्त्वाचा पदार्थ आहे. याशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे. हिरवी कोथिंबीर फक्त पदार्थांची चवच नाही वाढवत तर ती भाज्या आणि तर पदार्थ सजवण्यासाठी वापरली जाते. कोथिंबीरच्या वापराने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते. कोणताही ऋतू किंवा सीजन असो कोथिंबीर दररोज स्वयंपाकघरात लागते. उन्हाळ्यात तर कोथिंबीर महाग आहे. आपण एवढी महागडी कोथिंबीर विकत घेऊन येतो, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर २ ते ३ दिवसात सुकते किंवा कुजते. अशावेळी कोथिंबीर स्टोअर करून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानात्मक काम आहे. पण आम्ही तुमचं येऊ काम सोपं करणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत ज्याला फॉलो करून तुम्ही अनेक दिवस फ्रिजमध्ये कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकता.

टीप नंबर एक

कोथिंबीर स्टोअर करण्याचा एक मार्ग म्हणजे कोथिंबीरची पाने पेपरमध्ये छान व्यवस्थित गुंडाळणे. या पेपरमध्ये अजिबात हवा जाऊ देऊ नका. यानंतर, पेपर एअर टाईट बॉक्समध्ये बंद करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. बॉक्समध्ये ठेवलेल्या कागदाला थोडासा ओलावा आला तर कोथिंबीर सडू शकते.

टीप नंबर दोन

दुसऱ्या टीप नुसार कोथिंबीर स्टोअर करण्यासाठी टिश्यू आणि एअर टाइट कंटेनर हवा आहे. फक्त या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही कोथिंबीर काही दिवस ताजी ठेवू शकता. सगळ्या आधी कोथिंबीर छान २-३ वेळा पाण्यात नीट धुवून घ्या. कोथिंबिरीचे पाणी नीट काढून घ्या. कोथिंबीर छान पुसून घ्या. कोथिंबीरीचे पूर्णपणे पाणी सुकवण्यासाठी उन्हात वाळवावे. आता ही कोथिंबीर टिश्यूमध्ये गुंडाळा आणि टिश्यू एअर टाईट डब्यात ठेवा. आता या बॉक्समध्ये कोथिंबीर बंद करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in