मातीला जसा आकार दिला जातो तसाच काहीसा आकार लहान मुलं जन्माला आलं की त्याला दिला जातो. बाळाचे नाक, हात, पाय यांना नीट आकार देण्यासाठी लहान बाळाला मालिश केली जाते. त्यासोबत बाळ जन्मलेल्या नंतर बरोबर १२ किंवा १५ दिवसांनी त्याचे कानही टोचले जाते. ही प्रक्रिया बाळासोबत बाळाच्या आई-वडिलांनी जितकी वेदनादायक वाटते, तितकीच कदाचित असेलही. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, लहान बाळाची कानाची पाळी ही खूप पातळ आणि नाजूक असते. त्यामुळे तेव्हा कान टोचताना त्यांना जास्त त्रास होत नाही. हीच गोष्ट ते थोडे मोठे झाल्यावर केली तर त्यांना कान टोचताना प्रचंड त्रास होतो.
काही बाळांना कान टोचल्यावर कानाला सूज येते तर काहींना जखमाही होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
केवळ सोन्याचा वापर : कान टोचल्यानंतर किंवा नाक टोचल्यानंतर खाज आणि इरिटेशनसारख्या समस्या होतात. अशा धातूपासून तयार रिंग कानात किंवा नाकात घातल्याने ही समस्या अधिक वाढू शकते. पण सोन्याची रिंग घातल्याने खाज किंवा इरिटेशनची समस्या होत नाही.
हळदीचा लेप : कान टोचल्यानंतर लहान बाळाच्या कानाच्या त्वेचवर हळदीचा लेप लावा. हळदीसोबत थोडं खोबऱ्याचे तेल लावल्यास जखम लवकर बरी होते.
स्वच्छतेची काळजी घ्या : इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी कानाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जर कुणाचे कान टोचले असतील आणि एखादी जुनी रिंग कानात घालायची असेल तर आधी स्वच्छतेची काळजी घ्या. ईअररिंग आधी स्टर्लाइझ करा आणि नंतर वापरा. ईअररिंगची स्वच्छता गरम पाण्याने करावी. सोन्या-चांदीचे ईअररिंग सुद्धा २० मिनिटे गरम पाण्यात ठेवून नंतर घालावी.
अशा पद्धतीने लहान बाळाचे कान टोचताना विशेष काळजी घेतली तर बाळाला जास्त त्रासही होणार नाही. कान टोचण्याची ही प्रक्रिया अगदी सहजपणे पार पडेल.