उन्हाळ्यात चेहरा आणि त्वचेची 'अशी' घ्या काळजी; जाणून घ्या ५ सोप्या स्टेप्स

चैत्र महिना सुरू झाला आहे. उन्हाळा आता आणखी कडक झाला आहे. मात्र, तरी आपल्याला दैनंदिन कामकाजामुळे उन्हात फिरावेच लागते. त्याचा परिणाम चेहरा आणि त्वचेवर होतो. चेहरा काळवंडतो तर त्वचेला दाह निर्माण होतो.
उन्हाळ्यात चेहरा आणि त्वचेची 'अशी' घ्या काळजी; जाणून घ्या ५ सोप्या स्टेप्स
Freepik
Published on

चैत्र महिना सुरू झाला आहे. उन्हाळा आता आणखी कडक झाला आहे. मात्र, तरी आपल्याला दैनंदिन कामकाजामुळे उन्हात फिरावेच लागते. त्याचा परिणाम चेहरा आणि त्वचेवर होतो. चेहरा काळवंडतो तर त्वचेला दाह निर्माण होतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा आणि चेहऱ्याची खास काळजी घ्यावी लागते. जाणून घ्या उन्हाळ्यात चेहरा आणि त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या या ५ सोप्या स्टेप्स...

चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा

उन्हातून आल्यानंतर साधारण १० मिनिटांनी चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा. गार पाणी त्वचेचा दाह कमी करतो. तसेच त्वचेची बाह्य स्वच्छता करतो. पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तो लगेच पुसू नका. चेहऱ्यावर पाणी तसेच राहू द्या. यामुळे चेहऱ्याला नरीशमेंट मिळेल. त्वचा मऊ होण्यासाठी मदत होईल.

कोरफडचा गर किंवा जेल लावा

तुमच्याकडे कोरफड असेल तर ते खूप उत्तम असेल. कोरफडचा गर एका वाटीत काढून घेऊन तो चेहरा, मान, गळा आणि हाताच्या त्वचेवर लावा. जेव्हा कोरफडचे गुणधर्म थंड असतात. तसेच हे त्वचेला खोलवर स्वच्छ करते. त्यामुळे चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. त्वचेची जळजळ थांबेल. कोरफडचा गर हा डोळ्यांभोवतीचे डार्क सर्कलही दूर करतो. तुमच्याकडे कोरफड नसेल तर त्याऐवजी कोरफडच्या जेलचा वापर करा. कोरफडचा गर किंवा जेल चेहऱ्यावर किमान १५ ते २० मिनिटे ठेवा नंतर चेहरा पुन्हा कोमट पाण्याने धुवा.

कच्च्या दुधाने चेहरा साफ करा

कच्चे दूध हे नैसर्गिक क्लिंजर आहे. यामुळे चेहरा अतिशय खोलवर स्वच्छ होतो. कच्च्या दुधातील घटक त्वचेवरील काळवंडलेपणा कमी करतात. सोबतच दुधाचे पोषक तत्त्व त्वचेला मिळतात. यामुळे चेहरा चमकदार बनतो.

चेहऱ्याला फेस पॅक लावा

कच्च्या दुधाने चेहरा साफ केल्यानंतर चेहऱ्याला फेस पॅक लावा. तुम्ही घरच्या घरी तुमच्या त्वचेनुसार योग्य ते फेसपॅक तयार करू शकतात.

लोशन किंवा मॉइश्चरायजर लावा

चेहरा स्वच्छ झाल्यानंतर चेहऱ्यावर तुमच्या चेहरा आणि त्वचेला आरामदायी लोशन किंवा मॉइश्चरायजर लावा. यामुळे तुमचा चेहरा आणि त्वचा मऊ होईल. तसेच चेहरा उजळेल.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in