
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे ही हल्ली अनेकांची सवय बनली आहे. अनेकांना तर बेड टी अर्थात झोपेतून उठल्यावर दात न घासताच चहा पिण्याची सवय असते. भारतात तर अतिशय कमी काळात चहा इतका प्रचंड लोकप्रिय झाला आहे की आज चहा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. काहींना तर चहाचे अगदी व्यसन जडलेले असते. मात्र, आरोग्यासाठी ही सवय अतिशय घातक आहे. जाणून घ्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनश्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी किती घातक आहे. (Tea Side Effects)
पचनक्रियेसंबंधित आजार
सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पोटातील ॲसिडची मात्रा एकदम वाढू शकते. कारण रिकाम्या पोटात अॅसिड असते तर चहामध्ये असणाऱ्या ॲसिडमुळे याचे प्रमाण आणखी वाढते. परिणामी याचे शरीरावर मोठे दुष्परिणाम होतात. छातीत जळजळ होणे, अपचन, पोट फुगणे आणि गॅससारख्या समस्या होऊ शकतात.(Tea Side Effects)
बद्धकोष्ठता वाढते
अनेकांना चहा पिल्याशिवाय शौच येत नाही. मात्र, हा चुकीच्या सवयीचा परिणाम असतो. चहा पोट स्वच्छ करण्यासाठी मदत करत नाही. याउलट रिकाम्या पोटी चहा पिल्याने बद्धकोष्ठता वाढते.
मळमळ होणे (Tea Side Effects)
रिकाम्या पोटी चहा पिल्याने मळमळ होण्याची शक्यता असते. त्यातच जर तुम्ही नुसत्या दुधाचा चहा घेत असाल तर यामुळे मळमळ होण्याची मोठी शक्यता असते.
लोह आणि कॅल्शिअमचे व्यवस्थित शोषण होत नाही
चहामधील टॅनिन हे घटक शरीराला आवश्यक असलेले लोह आणि कॅल्शिअम अन्नातून शोषण करण्यास अडथळे निर्माण करते. परिणामी सकाळी सकाळी अनश्या पोटी चहा प्यायल्याने शरिरात लोह आणि कॅल्शिअमची कमतरता होऊ शकते.
चयापचय क्रियेवर परिणाम(Tea Side Effects)
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याने चहातील हानिकारक टॅनिन आणि कॅफिनचा चयापचय क्रियेवर अतिशय विपरित परिणाम होतो. चयापचय क्रिया हळूहळू मंद होते.
दातांवर डाग पडणे
सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेचच बेड टी घेत असाल तर याचा दातांवर विपरित परिणाम होतात. चहामधील टॅनिन नावाच्या घटकामुळे दातांवर डाग पडतात. हे डाग तुमची स्माईल बिघडवू शकतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)