
बऱ्याच जणांना शेतीमध्ये आवड असते पण जमीन नसल्याने शेती करणे टाळतात. पण जमिनीशिवाय आणि मातीशिवाय आपण शेती करू शकतो हे तुम्हाला सांगितले तर आश्चर्यचकीत होऊ नका. होय, अगदी कमी जागेत जमिनीशिवाय आणि मातीशिवाय आपण उत्तम प्रकारे शेती करून भरघोस उत्पन्न तयार करू शकतो. ते कसे? यासाठी पुढे दिलेली माहिती नक्की बघा.
हायड्रोपोनिक शेती
हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीच्या ऐवजी पाणी आणि आवश्यक पोषणतत्त्वांच्या मिश्रणात वनस्पतींची लागवड करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये वनस्पतींच्या मुळांना मातीमध्ये न रुजवता, पोषणतत्त्वांनी परिपूर्ण पाण्याच्या मिश्रणात वाढवले जाते. हायड्रोपोनिक शेतीला पारंपारिक शेतीच्या तुलनेत कमी पाणी लागते, तसेच पाण्याचा पुनर्वापर देखिल करता येतो आणि वनस्पतीला अधिक पोषण मिळते तसेच भरपूर उत्पन्न देखिल मिळू शकते.
हायड्रोपोनिक शेतीचे फायदे
कमी जागेत अधिक उत्पादन
पाणी आणि खतांचा कमी वापर
हवा आणि तापमान नियंत्रित करून उत्कृष्ट उत्पादन
अधिक उत्पादन आणि कचऱ्याची कमी
हायड्रोपोनिक शेती कशी करावी?
प्लास्टिक किंवा ग्लास कंटेनर: हायड्रोपोनिक सिस्टममध्ये पाणी व पोषणतत्त्व राखण्यासाठी कंटेनर लागतो.
ट्रिशनल सोल्यूशन: पिकांना लागणारे पोषणतत्त्व एकत्र करून तयार केलेले पाणी.
गवत: वणस्पतींच्या मुळांना आधार देण्यासाठी.
हायड्रोपोनिक सिस्टम तयार करा
योग्य कंटेनर निवडा आणि त्यामध्ये पाणी व पोषणतत्त्वांचा मिश्रण सोडा.
पिकांची लागवड करा तुम्ही निवडलेली पिकं तिथे योग्य पद्धतीने रोपा.
हायड्रोपोनिक पद्धतीत पाणी व पोषणतत्त्वांचं प्रमाण, प्रकाश, वारा, तापमान आणि पाणीचा PH स्तर कसा आहे हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे.
नियमित देखभाल तसेच प्रत्येक दिवशी पाणी आणि पोषण मिश्रणाची पातळी तपासा. विना मातीच्या शेतीमध्ये, पिकांना आवश्यक असलेली सर्व पोषणतत्त्वे नियमित देणे आवश्यक आहे.
पाणी वाचवते : हायड्रोपोनिक शेतीमध्ये कमी पाणी लागते कारण पाण्याचा पुनर्वापर करता येतो.
झपाट्याने वाढ : हायड्रोपोनिक पद्धतीने पिकांची वाढ जलद होते.
जागा कमी : तुम्ही छोटे पिक घरामध्ये हायड्रोपोनिक पद्धतीने उगवू शकता.
जास्त उत्पादन : मातीच्या तुलनेत, हायड्रोपोनिक पद्धतीत अधिक उत्पादन मिळवता येते.
कोणती पिके वापरु शकता
हायड्रोपोनिक शेतीमध्ये तुमच्या पिकांची निवड महत्त्वाची आहे. घरात हायड्रोपोनिक पद्धत यशस्वी होण्यासाठी टोमॅटो, कोबी,पालक, मिरची,कोथिंबीर ही पिकं वापरु शकता.
(टीप : संपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला थोडा खर्च येईल, पण एकदा तुमची सिस्टम नियमीत झाल्यानंतर , तुमचे शेती व्यवस्थापन आणि उत्पन्न दोन्ही सुरळीत होईल)