लग्नासाठी 'अशी' करा घागऱ्याची निवड, लूक दिसेल 'लय भारी'

तुम्ही लग्नासाठी घागरा निवडत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
लग्नासाठी 'अशी' करा घागऱ्याची निवड, लूक दिसेल 'लय भारी'

सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नाची तारीख ठरली की भावी वधू आणि करवल्या बस्ता खरेदीमध्ये रमतात. लग्नामध्ये प्रत्येक वधूला खास दिसायचं असतं. मेकअप, हेअरस्टाइल, दागिने याबरोबरच महत्त्वाची ठरते ती लग्नाच्या पोषाखाची निवड. लग्नासाठी साडी ही पहिली पसंती असली तरी सध्या लेहंगा किवा घागरा ट्रेंडमध्ये आहे. रील्समध्ये किंवा अभिनेत्रींनी घातलेल्या वजनदार घागऱ्याची भुरळ तरुणीॆवर पडलेली दिसून येत आहे. त्यामुळे विशिष्ट पद्धतीच्या घागऱ्यांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे. तुम्ही लग्नासाठी घागरा निवडत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

निवड घेरदार घागऱ्याची

■ घागरा खरेदी करण्यापूर्वी उंची, वजन, शारीरिक ठेवण याचा जरूर विचार करा.

■ बऱ्याचदा घागरा डोळ्यांना छान दिसतो, पण घातल्यानंतर तितकासा आकर्षक वाटत नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी घागरा एकदा ट्राय करून पहा.

■ उंची जास्त आणि वजन कमी असेल तर घेरदार घागऱ्याची निवड करा. त्यामुळे लुक चांगला दिसेल.

■ उंची कमी पण वजन जास्त असणाऱ्यांनी नाजूक डिझाइन असणारा घागरा निवडावा. त्यामुळे उंची जास्त भासेल आणि जास्तीचं वजन लपलं जाईल.

■ वजन जास्त असलं तरी उंचीच्या प्रमाणात शोभून दिसणारा फिटिंगचा घागरा निवडावा. तो तुमच्यावर खुलून दिसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in