मुलांना आजारांपासुन दूर ठेवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ

तुमचे मुल कमजोर असेल तर त्याच्या आहारात तूप, लोणी, डाळ, दूध, केळे, बीटसह हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
मुलांना आजारांपासुन दूर ठेवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ

आपलं मुल शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावे असं प्रत्येक पालकाला वाटतं असतं. मुलांचे आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा. मुलांच्या शरीरात रोज व्हिटॅमिन, मिनरल्स, फॅट आणि प्रोटीन संतुलितील प्रमाणात असायला पाहिजे. त्यांच्या शारीरीक विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. तुमचे मुल कमजोर असेल तर त्याच्या आहारात तूप, लोणी, डाळ, दूध, केळे, बीटसह हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

1. बनाना शेक

केळे एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. हे कमजोर मुलांसाठी अतिशय लाभदायक आहे. याचा शेक किंवा दूध आणि केळे मुलांना खाऊ घाला. यामुळे त्यांचे वजन वाढेल.

2. डाळींचे सेवन

डाळी प्रोटीनच्या सर्वात मोठ्या स्त्रोत आहेत. डाळीच्या पाण्यात सुद्धा योग्य मात्रेत प्रोटीन आढळते. मुल कमजोर असेल तर त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला नियमितपणे डाळीचे पाणी प्यायला द्या.

3. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन

हिरव्या भाज्यांमध्ये पोषकतत्व असतात. मुलांना ब्रोकली, मटर, पालक आणि कोबी द्या. याद्वारे मुलांना चवीसह पोषणसुद्धा मिळेल. 

4. अंडे आणि बटाटा

कमजोर मुलांसाठी अंडे आणि बटाटा लाभदायक आहे. कारण बटाट्यात कार्बोहायड्रेट आणि अंड्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. कमजोर मुलांचे वजन वाढवण्यासाठी याचे सेवन आवश्यक आहे.

5. तूप किंवा लोणी

तूप आणि लोण्यात भरपूर फॅट असते. हे मुलांना नियमित द्यावे. तूप डाळ किंवा चपातीला लावून मुले खाऊ शकतात.

6. मलईचे दूध

मलईच्या दुधाच्या सेवणामुळे मुलांचे वजन वाढण्यास मदत होते. मुल दूध पित नसेल तर शेक किंवा चॉकलेट पावडर मिक्स करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in