Yoga Day 2024: योगा सोबत आवर्जून आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ, मिळतील अनेक फायदे

International Day of Yoga 2024: यंदा आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त योगा करत आणि आहारात बदल करत जीवन आरोग्‍यदायी व आनंदी ठेवा.
Yoga Day 2024: योगा सोबत आवर्जून आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ, मिळतील अनेक फायदे
Freepik
Published on

Health Care: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिनाचा शारीरिक, मानसिक व आध्‍यात्मिक आरोग्‍य सुधारण्‍यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्‍याच्‍या फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करण्‍याचा उद्देश आहे. योगाचे अधिकाधिक फायदे घेण्‍यासाठी आहार संतुलित व आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. अशा आहारामध्‍ये हंगामी फळे व भाज्‍या, हिरव्‍या पालेभाज्‍या, संपूर्ण धान्य, कडधान्‍ये व बदामांसारख्‍या नट्सचा समावेश असला पाहिजे, जे एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषत: बदामांमध्‍ये १५ आवश्‍यक पौष्टिक घटकांसह प्रोटीन, झिंक, मॅग्‍नेशियम, फॉस्‍फरस, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई असते.

दैनंदिन आहारामध्‍ये मूठभर बदामांचा समावेश केल्‍याने अनेक आरोग्‍यदायी फायदे मिळतात. बदाम हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात, तसेच वजन व कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास देखील मदत करतात आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवतात, जे एकूण आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहे. बदाम उत्तम प्री-वर्कआऊट स्‍नॅक देखील आहेत, ते स्‍नायूदुखी दूर करण्‍यास मदत करू शकतात आणि व्‍यायामानंतर रिकव्‍हरी सुधारू शकतात, जे नुकतेच आल्‍मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने निधीसाह्य केलेल्‍या विटार्ड संशोधनामधून निदर्शनास आले. म्‍हणून, सानुकूल निष्‍पत्तींसाठी प्री-वर्कआऊट स्‍नॅक म्‍हणून बदामांचे सेवन करा.

आंतरराष्‍ट्रीय योग दिनाबाबत सांगताना बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाल्‍या, ''मी दीर्घकाळापासून योगा करत आहे, ज्‍यामुळे मला अनेक सकारात्‍मक आरोग्‍यदायी फायदे मिळाले आहेत, जसे माझे आतड्यांचे आरोग्‍य सुधारले आहे, रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ आहे, माझी त्‍वचा कोमल आहे. नियमितपणे योगा करण्‍यासोबत मी आरोग्‍यदायी व संतुलित आहाराचे सेवन करते, ज्‍यामध्ये हंगामी फळे व भाज्‍या, बदाम, दही अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. बदाम अनेक वर्षांपासून माझे पसंतीचे स्‍नॅक आहे. मी माझ्या दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करते, विशेषत: योगा केल्‍यानंतर बदामांचे सेवन करते. या नट्समध्‍ये प्रोटीन आणि १४ इतर आवश्‍यक पौष्टिक घटक आहेत, जे एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करतात.''

नवी दिल्‍लीमधील मॅक्‍स हेल्‍थकेअर येथील डायटेटीक्‍सच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्‍हणाल्‍या, ''मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना आठवड्यातून किमान पाच दिवस व्‍यायाम करण्‍याची शिफारस करते, ज्‍यामध्‍ये योगाला अधिक प्राधान्‍य देते. शारीरिक व्यायामाव्‍यतिरिक्‍त फिटनेस ध्‍येये संपादित करण्‍यासाठी आहार संतुलित व आरोग्‍यदायी असणे महत्त्वाचे आहे. बदाम, हिरव्‍या पालेभाज्‍या, फळे आणि इतर पौष्टिक पर्यायांचा आहारामध्‍ये समावेश करणे एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे. विशेषत: दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश असला पाहिजे, कारण बदामांमध्‍ये पौष्टिक घटक असण्‍यासोबत अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत, जसे वजन, रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या व कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण राहते.''

आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत न्‍यूट्रिशन अँड वेलनेस कन्‍सल्‍टण्‍ट शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ''माझा दृढ विश्‍वास आहे की प्रत्‍येकाने जीवनात योगा केला पाहिजे, योगामुळे आनंदी व आरोग्‍यदायी जीवनशैलीला चालना मिळते. योगा केल्‍याने शारीरिक ताकद, संतुलन व स्थिरता सुधारते, तसेच योगामुळे अनेक आरोग्‍यदायी फायदे मिळतात. व्‍यायामासोबत संतुलित व आरोग्‍यदायी आहाराचे सेवन सानुकूल निष्‍पत्तींसाठी महत्त्वाचे आहे. बदाम गुणकारी आहेत, जे ऊर्जा वाढवण्‍यास, थकवा दूर करण्‍यास मदत करतात, तसेच आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पौष्टिक घटक देतात. याव्‍यतिरिक्‍त, दररोज मूठभर बदाम सेवन केल्‍याने रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या व एलडीएल कोलेस्‍ट्रॉल कमी होण्‍यास मदत होऊ शकते.''

फिटनेस व सेलिब्रिटी इन्‍स्‍ट्रक्‍टर यास्‍मीन कराचीवाला यांचा देखील विश्‍वास आहे की, दैनंदिन जीवनात कोणत्‍याही प्रकारचा व्‍यायाम करणे जीवन आरोग्‍यदायी राखण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, ''स्‍ट्रेन्‍थ ट्रेनिंग व पिलेट्स स्‍नायूबळ वाढवण्‍यास आणि देहबोली उत्तम राखण्‍यास मदत करतात, तर योगा शरीर व मन आनंदी ठेवते. मी माझ्या कामाच्‍या व्‍यस्‍त वेळापत्रकामध्‍ये संयमी राहण्‍यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा योगा करते. माझा विश्‍वास आहे की, व्‍यायाम व आरोग्‍यदायी आहार महत्त्‍वाचे आहेत. आरोग्‍यदायी राहण्‍यासाठी अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि बदामांसारख्‍या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सर्वोत्तम आहे. बदामांमध्‍ये प्रोटीन, फायबर व आरोग्‍यदायी फॅट्स यांसारखे आवश्‍यक पौष्टिक घटक असतात, ज्‍यामुळे दैनंदिन पोषणासाठी महत्त्वाचे आहेत. बदामांची खासियत म्‍हणजे ते अनेक पद्धतीने सेवन करता येऊ शकतात आणि आरोग्‍यदायी फायदे देखील मिळतात.''

एमबीबीएस व न्‍यूट्रिशनिस्‍ट डॉ. रोहिनी पाटील यांचा देखील विश्‍वास आहे की जीवन आनंदी व आरोग्‍यदायी राखण्‍यासाठी नियमिपणे योगा केला पाहिजे. त्‍या म्‍हणाल्‍या, ''माझा दृढ विश्‍वास आहे की, योगाच्‍या क्षमतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मी माझ्या क्‍लायण्‍ट्सना दैनंदिन नित्‍यक्रम म्‍हणून योगा करण्‍यासोबत पौष्टिक व घरी बनवलेले फूड सेवन करण्‍याची शिफारस करते. योगामुळे शारीरिक ताकद व स्थिरता सुधारते, तसेच आरामदायी व उत्तम झोप मिळण्‍यास देखील मदत होते. याव्‍यतिरिक्‍त, बदामांचे सेवन केल्‍याने हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते आणि तणाव व रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत होते. योगासोबत अधिक आरोग्‍यदायी फायद्यांसाठी आहारामध्‍ये बदामांसारख्‍या पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. प्रोटीन व फायबरने संपन्‍न बदाम रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या कमी करण्‍यास आणि वजनावर नियंत्रण ठेवण्‍यास मदत करतात.''

लोकप्रिय साऊथ इंडियन अभिनेत्री प्रणिता सुभाष मन व शरीर शांत ठेवण्‍यासाठी आणि व्‍यस्‍त कामादरम्‍यान आनंदी व उत्‍साही राहण्‍यासाठी योगा करतात. त्‍या म्‍हणाल्‍या, ''योगा माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. योगामुळे मला माझ्या व्‍यस्‍त कामादरम्‍यान अवधान केंद्रित ठेवण्‍यास मदत होते. मी काम व जीवन संतुलन राखण्‍यासाठी आठवड्यातून किमान २ ते ३ दिवस योगासने करते. आरोग्‍याप्रती माझ्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा भाग म्‍हणून मी अगोदरच माझ्या आहाराचे नियोजन करते, ज्‍यामध्‍ये हंगामी फळे व हिरव्‍या पालेभाज्‍या अशा फूड्सना प्राधान्‍य देते. बदामांमध्‍ये पौष्टिक घटक असतात, ज्‍यामुळे मी माझ्या आहारामध्‍ये बदामांचा समावेश करते. तसेच दीर्घकाळापर्यंत भूकेचे शमन करण्‍यासाठी सोबत बदामांचा बॉक्‍स ठेवते. मी माझ्या कुटुंबाच्‍या आहारामध्‍ये देखील बदामांचा समावेश करते, ज्‍यामुळे त्‍यांना देखील पौष्टिक फायदे मिळतात.''

logo
marathi.freepressjournal.in