Happy International Family Day 2024: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी १५ मे रोजी साजरा केला जातो. गेली ३० वर्ष हा दिवस साजरा केला जात आहे. जगभरातील कुटुंबांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने युनायटेड नेशन्सने हा दिवस सुरु केला जातो. या काळात एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ तुटली आहे. भारतातील बहुतांश ग्रामीण भागातच आता मोठी एकत्र कुटुंबे बघयाला मिळतात. शहरात मात्र विभक्त छोटी कुटुंब बघायला मिळतात. कुटुंबे तुटण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक अहंकार, दुसरे पैसा, तिसरे वैचारिक मतभेद आणि अन्य अनेक कारणामुळे कुटूंब तुटत आहेत. पण प्रत्येकासाठी कुटुंब महत्त्वाचे असते. आजच्या या खास दिनी जगभरातील कुटुंबांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. तुमच्यासाठी तुमचं कुटुंब किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी तुम्ही कुटुंबियांना पाठवू शकाल असे आम्ही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही तुमच्या कुटुंबावरच प्रेम व्यक्त (international day of family 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) करू शकता.
पाठवा हे शुभेच्छा संदेश
> कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे , जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
> आपली सर्वात मोठी शाळा म्हणजेआपलं स्वतःच कुटुंब होय
कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
> आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा,
फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
> कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं असले पाहिजे,
कोणी बारीक.., कोणी मोठं..,
कोणी स्लो.., कोणी फास्ट..,
पण जेव्हा कोणाचे १२ वाजणार असेल
तेव्हा सर्व एकत्र असले पाहिजे.
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
> नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत, नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)