International Day of Potato 2024: नाश्त्यासाठी झटपट बनवा आलू पोहा रोल, नोट करा रेसिपी

Aloo Poha Roll Recipe: १३० देशांमध्ये ४,००० व्हरायटीसह बटाटे जागतिक स्तरावर अगदी सगळ्यांनाच आवडतात. आंतरराष्ट्रीय बटाटा दिनानिमित्त, बटाट्याच्या या हटके रेसिपीसह हा दिवस साजरा करूया.
International Day of Potato 2024
N'Oven - Cake & Cookies / YouTube
Published on

Breakfast Recipe: या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस ३० मे रोजी साजरा केला जात आहे. बटाटा ही अगदी सगळ्यांचीच आवडीची भाजी आहे. बटाटा शिजवायला सोपा आहे आणि तसेच बऱ्यापैकी स्वस्तही असतो. बटाटा आणि पोहे हे दोन्ही मुलांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहेत. अनेक वेळा हे दोन्ही पदार्थांपासून बनवलेले पदार्थ नाश्त्यात खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला बटाटा पोह्याच्या रोलची रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या घाईत हा चविष्ट पदार्थ झटपट तयार होईल. बटाटा पोहा रोल तर कमी वेळात तयार होतोच पण बनवायलाही खूप सोपा आहे. आलू पोह्याचा रोल मुलांच्या टिफिन बॉक्समध्येही देता येईल. जर तुम्ही अजून आलू पोहा रोल बनवला नसेल, तर आम्ही दिलेली रेसिपी ट्राय करून बघा. बटाटा पोहे रोल बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

  • उकडलेले बटाटे - ३-४

  • पोहे - १/२ कप

  • ब्रेड स्लाईस - २

  • चाट मसाला - १/२ टीस्पून

  • धणे पावडर - १ टीस्पून

  • हिरवी कोथिंबीर - १ टेबलस्पून

  • तेल - तळण्यासाठी

  • मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

  • सर्वप्रथम बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. त्यांना एका भांड्यात काढून ठेवा.

  • यानंतर ब्रेडचे तुकडे करून बटाट्यात घालून मिक्स करा.

  • आता भिजवलेले पोहे घ्या (साधारण १०-१५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा) आणि एका भांड्यात ठेवा आणि बटाटे आणि ब्रेड क्रंब्ससह चांगले मॅश करा.

  • संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात चाट मसाला, धनेपूड आणि हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

  • यानंतर, तयार मसाल्यापासून दंडगोलाकार रोल तयार करा आणि थाळी किंवा प्लेटमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे सर्व मसाला घालून रोल तयार करा.

  • आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर कढईच्या क्षमतेनुसार रोल घालून तळून घ्या.

  • बटाटा पोहे रोल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. यानंतर, एका प्लेटमध्ये रोल काढा. त्यांना नीट शिजवण्यासाठी २-३ मिनिटे लागतील.

  • तसेच सर्व बटाटे पोहे रोल डीप फ्राय करून घ्या.

  • नाश्त्यासाठी चविष्ट बटाटा पोहा रोल तयार आहे. त्यांना हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in