How to lose weight without exercise: डाएट हा शब्द तुम्ही ऐकलंच असेल. अनेक फिटनेस फ्रिक (Health Care) आवर्जून डाएट फॉलो करतात. यामुळेच दरवर्षी ६ मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना त्यांचे शरीर आणि अन्न यांच्यात निरोगी नाते निर्माण करण्यावर भर देणे. तसेच फक्त बरोबर साइज किंवा आकार बघत न बसता निरोगी राहणे महत्त्वाचे आहे हे देखील समजावून सांगणे. असे बरेच लोक आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव डाएट करतात. डाएट केल्यामुळे ते बिनधास्तपणे खाऊ-पिऊ शकत नाहीत, यामुळे ते शारीरिक आणि मानसिक समस्यांमधून जातात.
नो डाएट डे वर, लोक त्यांना पाहिजे ते खातात आणि त्यांच्या शरीराचा आकार किंवा आकार काहीही असो, स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला वचन देतात की ते स्वतःची काळजी घेतील.
वाढलेल वजन ही एक मोठी समस्या झाली आहे. जर तुम्हीही या समस्येतून जात असाल तर आणि तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आहार किंवा व्यायाम करावा लागणार नाही, परंतु काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही वजन कमी करू शकता.
भरपूर पाणी प्या
होय तुम्हाला जण कमी करायचं असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे वजन कमी करण्यात अडचण येते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज पुरेसे पाणी पिण्यास सुरुवात करा. लक्षात घ्या पाणी प्यायल्याने केवळ वजनचं कमी होत नाही तर आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे मिळतात.
हळूहळू खा
अन्न हळूहळू नीट चावून खाणे गरजेचे आहे. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होईल आणि लठ्ठपणा वाढणार नाही. हळू हळू अन्न खाल्याने शरीराला त्या अन्नातून पोषक तत्वेही मिळतील आणि त्याचे फायदेही शरीरावर लवकर दिसू लागतील. म्हणूनच,ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी वजन कमी करण्यासाठी हळूहळू खाण्याचा सल्ला दिला जातो.
चालणे
हो फक्त चालल्यामुळेही बऱ्यापैकी वजन कमी होते. हा एक हलका फुलका व्यायाम आहे. पण आता प्रश्न पडतो कि कधी चालावे? तर वजन कमी करण्यासाठी, विशेषतः कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर, १५ ते २० मिनिटे चालणे सुरू करा. दिवसभरात वेळ मिळत नसेल तर रात्री अर्धा तास चालत जा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)