International Panic Day 2024: पॅनिक अटॅक टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या लक्षणं

Panic Attack Symptoms: पॅनिक अटॅक या आजराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, लोकांना चिंतेपासून मुक्त करण्यासाठी आणि शांत राहण्याचे फायदे समजून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय पॅनिक डे १८ जून रोजी साजरा केला जातो.
International Panic Day 2024: पॅनिक अटॅक टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या लक्षणं
Freepik
Published on

Health Care: बदलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक लोक आजकाल नैराश्य, चिंता, पॅनीक अटॅक अशा आजारांना बळी पडत आहेत. या आजारांना वेळीच ओळखून उपचार न केल्यास याचे वाईट परिणाम होऊ शकतात. हे आजार टाळण्यासाठी किंवा यातून लवकर बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.

पॅनिक अटॅक या आजराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, लोकांना चिंतेपासून मुक्त करण्यासाठी आणि शांत राहण्याचे फायदे समजून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय पॅनिक डे १८ जून रोजी साजरा केला जातो.

काय असतात लक्षणं?

पॅनिक अटॅकमध्ये अनेकदा काही लोकांना अगदी हृदयविकाराचा झटका आल्यासारखे जाणवते. पॅनिक अटॅकमुळे तुम्हाला इतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याच कारणांमुळे तुम्ही याही लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे.

  • सतत धोक्याची भावना येणे

  • शरीरावरील नियंत्रण गमावणे किंवा मृत्यूची भीती वाटणे

  • हृदय गती वाढणे - घाम येणे

  • श्वास घेण्यात अडचण येणे

  • मळमळ-पोटात पेटके येणे

  • छातीत दुखणे

  • डोकेदुखी होणे

पॅनिक अटॅक टाळण्यासाठी काय करायचं?

पॅनिक अटॅक टाळण्यासाठी अजूनतरी कोणताही विशिष्ट मार्ग किंवा उपाय नाही. मात्र, काही पद्धती अवलंबून हा अटॅक टाळता येऊ शकते. पॅनिक ॲटॅकचा त्रास वाढण्यापासून किंवा अधिक वेळा होण्यापासून रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर उपचार करा. यासाठी वरती नमूद केलेली लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टर कडे जा. पॅनिक अटॅक वारंवार येण्यापासून निरोगी लाईफस्टाईल आणि योग्य आहार ठेवा. नियमित शारीरिक हालचाली करा, त्यामुळे तणावाची समस्या नियंत्रणात ठेवता येईल.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in