Iron Deficiency: शहरातील महिलांमध्ये वाढतेय रक्तातील लोहाची कमतरता, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Women Health: लोहपातळी कमी होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे, ज्यामुळे हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी होऊन त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो.
Iron Deficiency: शहरातील महिलांमध्ये वाढतेय रक्तातील लोहाची कमतरता, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Published on

Anemia: शहरी महिला, लोकसंख्येतील असा भाग जो आरोग्याच्या बाबतीत जागरूक आणि सक्रिय असल्याचा अभिमान बाळगतो, त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता त्यांच्यामध्ये मूक साथीच्या रूपात लोहाची कमतरता हा आजार उदयास येत आहे. उत्तम आरोग्यसेवा आणि पोषक आहाराची उपलब्धता यासारखे शहरांमध्ये राहण्याचे फायदे असूनही, बऱ्याच शहरी स्त्रिया आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाने (आयडीए) ग्रस्त आहेत. लोहपातळी कमी होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे, ज्यामुळे हिमोग्लोबिनचे उत्पादन कमी होऊन त्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. या आरोग्य समस्येकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्याचे व्यक्ती आणि समाजावर दूरगामी परिणाम होत आहेत.

समस्येची व्याप्ती

जीवनशैली आणि काही विशिष्ट शारीरिक घटकांमुळे स्त्रियांना आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाचा त्रास होतो. गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयातील महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे धोका वाढतो, ज्यामुळे कालांतराने लोहाचे साठे कमी होऊ शकतात. गर्भधारणेमुळे हा धोका आणखी वाढतो, कारण गर्भाच्या विकासास आणि मातेच्या आरोग्यासाठी लोहाची मागणी वाढते. याव्यतिरिक्त, शहरी जीवनशैलीतील चुकीच्या आहार सवयींमुळे देखील त्रास होण्याची शक्यता वाढते प्रक्रिया केलेले अन्न ज्यामध्ये लोह तसेच इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते, त्याच बरोबर शहरातील धकाधकीचे जीवन ज्यामुळे संतुलित आहार बनविण्यासाठी वेळ मिळत नसल्याने समस्या अधिकच वाढते.

लक्षणे आणि परिणाम

आयडीएची लक्षणे बऱ्याचदा सहज लक्षांत न येणारी असतात, त्यामुळे ती व्यस्त शहरी जीवनशैलीचा परिणाम मानली जातात. थकवा, अशक्तपणा आणि एकाग्र होण्यामध्ये समस्या, या अष्टपैलूची भूमिका निभावणाऱ्या शहरी स्त्रियांच्या सामान्य तक्रारी आहेत. तथापि, ही लक्षणे लोहाच्या कमतरतेचे मुख्य सूचक देखील आहेत. इतर लक्षणांमध्ये त्वचेचा फिकटपणा, श्वासोच्छवासाचा त्रास, चक्कर येणे आणि नखे ठीसुळ होणे यांचा समावेश आहे. यावर उपचार न केल्यास, आयडीएमुळे हृदयाच्या समस्या, गर्भधारणे दरम्यान येणाऱ्या समस्या आणि बौद्धिक कामात समस्या यासारख्या गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Iron Deficiency: शहरातील महिलांमध्ये वाढतेय रक्तातील लोहाची कमतरता, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Iron Deficiency: आयर्न डेफिशियन्सी अ‍ॅनिमिया आजार आहे धोकायदायक; जाणून घ्या लक्षणं

आयडीएचा प्रभाव वैयक्तिक आरोग्यापलीकडील असू शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे कार्यक्षमता कमी होऊ शकते तसेच सुट्ट्यांचे प्रमाण वाढू शकते. नोकरी करणाऱ्या मातांसाठी, या रोगामुळे त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या आणि त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. कार्यक्षमते वर होणारा परिणाम यामुळे होणारे नुकसान आणि उपचारांवरील खर्च, यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान संभवते.

संकटाला सामोरे जाणे

शहरी महिलांमधील लोहाच्या कमतरतेच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. जागरूकता ही पहिली पायरी आहे. बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण आणि लोहाची पातळी पुरेशी ठेवण्याचे महत्त्व माहित नसते. लोहाच्या कमतरतेची लक्षणे, कारणे आणि परिणामांविषयी जागरूकता वाढविण्यात सार्वजनिक आरोग्य मोहीम आणि शैक्षणिक पुढाकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

आहाराच्या सवयी सुधारणे अत्यावश्यक आहे. महिलांनी आपल्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यामध्ये लीन मीट्स, मासे, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या आणि लोहयुक्त कडधान्ये यांचा समावेश आहे. त्याच बरोबर लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटो यासारख्या मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांची जोडणी केल्याने लोहाचे शोषण वाढू शकते. शाकाहारी आणि वेगन आहार घेणाऱ्या लोक, शाकाहारी लोकांमध्ये लोहाची जैव उपलब्धता कमी झाल्यामुळे जास्त धोका असू शकतो, आहारातील संतुलन आणि पूरकतेकडे लक्ष देणे विशेषतः महत्वाचे आहे.

Iron Deficiency: शहरातील महिलांमध्ये वाढतेय रक्तातील लोहाची कमतरता, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
CT Scan: सीटी स्कॅन करण्याचे काय आहे महत्व? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

आयडीएचे लवकर निदान आणि उपचारात डॉक्टरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नियमित तपासणी केल्याने लोहाच्या कमतरतेचे प्रमाण गंभीत होण्याआधी कमतरता लक्षात येण्यास मदत होऊ शकते, विशेषत: गर्भधारणा होऊ शकणाऱ्या वयातील महिला आणि गर्भवती महिलांसाठी. आवश्यक असल्यास, परिणामकारकतेसाठी आणि संभाव्य साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी लोह पूरक पदार्थ सेवन करण्याचा आणि चाचण्या करण्याचा सल्ला देणे आवश्यक आहे.

Iron Deficiency: शहरातील महिलांमध्ये वाढतेय रक्तातील लोहाची कमतरता, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health Care: मलेरिया की डेंग्यू, ताप कशामुळे आला हे कसे ओळखावे? जाणून घ्या तज्ञांकडून

शहरी महिलांमध्ये लोहाची कमतरता ही एक अशी आरोग्य समस्या आहे ज्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. जागरूकता वाढवून, निरोगी आहार पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून आपण या मूक साथीचा प्रभावीपणे सामना करू शकतो. आपल्या समुदायाच्या चैतन्यशीलतेसाठी आणि एकूणच सामाजिक-आर्थिक रचनेचे कल्याण लक्षात घेऊन शहरी महिलांच्या आरोग्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. या समस्येचे निराकरण केल्याने केवळ वैयक्तिक आरोग्य परिणामच सुधारत नाहीत तर उत्पादकता आणि जीवनाची गुणवत्ता देखील वाढवते आणि निरोगी आणि अधिक समृद्ध समाजात योगदान देते.

logo
marathi.freepressjournal.in