महिलांसाठी मासिक पाळीत आंबा आणि आंब्याचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या, योग्य माहिती

महिलांच्या आरोग्यासाठी आंबा किंवा आंब्याचे पदार्थ खाणे नेहमीच चांगले नसते. विशेष करून मासिक पाळीत आंबा खाणे चांगले की वाईट याबाबत महिलांमध्ये संभ्रम असतो. चला पाहूया योग्य माहिती...
महिलांसाठी मासिक पाळीत आंबा आणि आंब्याचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या, योग्य माहिती
Freepik & AI Generated Mix
Published on

आंबा फळांचा राजा सगळ्यांनाच आवडतो. तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. फक्त आंबाच काय तर आमरस, आंबा बर्फी, आंब्याची लस्सी, आंबा पोळी, आंबा पापडी, आंबा आईस्क्रीम हे सर्व पदार्थ खाण्याचा मोह कुणाला आवडत नाही. मात्र, महिलांच्या आरोग्यासाठी आंबा किंवा आंब्याचे पदार्थ खाणे नेहमीच चांगले नसते. विशेष करून मासिक पाळीत आंबा खाणे चांगले की वाईट याबाबत महिलांमध्ये संभ्रम असतो. चला पाहूया योग्य माहिती...

आंब्याचे गुणधर्म

आंबा हा शरीराला आवश्यक जीवनसत्त्व अ, क यांनी समृद्ध आहे. यामध्ये फोलेट आणि फायबर यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे ही आहे. याशिवाय आंब्यात फायबर आणि एन्झाईम्स असतात. जे पचन सुधारण्यास मदत करतात. मात्र, असे असले तरी आंबा हा उष्ण आहे. त्यामुळे आंब्याच्या सेवनावर मर्यादा आहे. कारण जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते.

मासिक पाळी

मासिक पाळी ही महिलांना दर २८ ते ३० दिवसांनी येते. मासिक पाळी येण्या अगोदर महिलांना पोट, कंबर, पाय दुखणे किंवा चेहऱ्यावर पिंपल येण्यासारखे त्रास होतात. मासिक पाळीतून बाहेर पडणारे रक्त हे उष्ण असते. प्रत्येक महिलेला मासिक पाळीतील रक्तस्राव कमी जास्त होत असतो.

पीसीओडीचा त्रास असेल तर...

ज्या महिलांना पीसीओडीचा त्रास असेल अर्थात नियमित पाळी न येणे. पाळी येण्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी लागणे. ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत महिलांनी आंबा खाणे हे उत्तम असते. आंब्याच्या उष्ण गुणधर्मांमुळे मासिक पाळी नियमित येण्यासाठी हे सहाय्यक ठरते.

रक्तस्राव कमी असेल तर...

मासिक पाळी रक्तस्राव कमी असेल आणि पोटदुखीचा त्रास नसेल तर तुम्ही आंबा खाऊ शकता. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. यामुळे रक्तस्राव योग्य प्रमाणात सुधारण्यास मदत होईल.

रक्तस्राव जास्त असेल तर...

ज्या महिलांना रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो अशा महिलांनी मासिक पाळी दरम्यान आंब्याचे सेवन न करणे हेच फायदेशीर ठरते. आंब्याच्या उष्ण गुणधर्मामुळे आणखी रक्तस्राव वाढू शकतो.

मासिक पाळीत अपचनाची तक्रार असल्यास...

अनेक महिलांना मासिक पाळीत अपचनाची समस्या असते. यामध्ये वारंवार शौचास होणे, शौच व्यवस्थित न होणे, पोटात गॅस अडकून राहणे अशा समस्या होतात. तुम्हाला मासिक पाळीत अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर मासिक पाळीत आंबा न खाणे योग्य राहते.

अतिरिक्त तणाव असेल तर...

मासिक पाळीत अनेक महिलांना ताणतणाव चिडचिड होण्यासारखे त्रास होतात. अशा परिस्थितीत आंबा किंवा आंबा आईस्क्रीम, आंबा लस्सी हे पदार्थ तुमचा मूड ठीक करू शकतात. आंब्यात मँगिफेरिन आणि गॅलोटानिन सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा समना करण्यास मदत करतात. त्यामुळे आंब्याचे कमी प्रमाणातील सेवन तुमचा मूड ठीक करू शकते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in