तुम्हीसुद्धा चहा-चपातीचा नाश्ता करता? जाणून घ्या आरोग्याला चांगले की वाईट

सकाळी उठल्यानंतर सर्वसामान्य अनेक माणसांच्या घरात चहा-चपातीचा नाश्ता केला जातो. कारण हा नाश्ता झटपट होतो. वेगळी भाजी करण्याची गरज पडत नाही. तसेच अनेकांना चहा-चपाती नाश्ता आवडीचा असतो. अनेकांना वाटते चपाती हे घरातील आणि गव्हापासून तयार होणारे अन्न असल्यामुळे हा आहार पौष्टिक आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. चला जाणून घेऊया चहा-चपातीचा नाश्ता करणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?
तुम्हीसुद्धा चहा-चपातीचा नाश्ता करता? जाणून घ्या आरोग्याला चांगले की वाईट
Youtube Short - @knowledgeindiatv
Published on

सकाळी उठल्यानंतर सर्वसामान्य अनेक माणसांच्या घरात चहा-चपातीचा नाश्ता केला जातो. कारण हा नाश्ता झटपट होतो. वेगळी भाजी करण्याची गरज पडत नाही. तसेच अनेकांना चहा-चपाती नाश्ता आवडीचा असतो. अनेकांना वाटते चपाती हे घरातील आणि गव्हापासून तयार होणारे अन्न असल्यामुळे हा आहार पौष्टिक आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. चला जाणून घेऊया चहा-चपातीचा नाश्ता करणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

चहाचे गुणधर्म

चहामध्ये साखर आणि टॅनिन नावाचा पदार्थ असतो. तसेच चहा हा दुधाचा तयार केलेला असतो. दुधाचा चहा हा मुळातच हानिकारक असतो. जेव्हा आपण चहा चपाती खातो तेव्हा चहा जास्त प्रमाणात लागतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

चहा-चपाती विरुद्ध आहार

चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे. आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार घेतल्यामुळे शरीरात विष तयार होते. हे विष संपूर्ण रक्तावाटे संपूर्ण शरीरात पसरते परिणामी वेगवेगळे त्वचेचे आजार जडतात.

Youtube Short - @knowledgeindiatv

टॅनिनमुळे प्रथिने शोषूण घेण्यास अडथळे

चहातील टॅनिन नावाचा घटक अन्नातील प्रथिने शोषून घेण्यासाठी विरोध करतो. त्यामुळे चपातीमधील प्रथिने शरीरात शोषली जात नाही.

चपातीत मीठ असल्याने...

चपातीत मीठ असते. चहा हा दुधाचा तयार करण्यात येतो. दूध आणि मीठ एकत्र येणे हे शरिरासाठी फार नुकसानदायक ठरते. त्यामुळे पोटाचे विविध आजार जडू शकतात. आतड्याला सूजही येऊ शकते. त्यामुळे चहा चपाती खाणे हे आरोग्यासाठी कधीही चांगले नसते.

Youtube Short - @knowledgeindiatv

चपातीला तेल किंवा तूप असते

याशिवाय चपातीला आपण तेल किंवा तूप लावलेले असते. हे तेल तसेच तूप चहात उतरते. परिणामी अशा विरुद्ध आहारामुळे हा नाश्ता आरोग्यासाठी आणखी हानिकारक ठरतो.

अॅसिड रिफ्लेक्सची समस्या

चहा-चपाती विरुद्ध आहार असल्याने अॅसिड रिफ्लेक्सची समस्या होऊन पोटात गॅसेस होणे, अपचन होणे, पोटात गंभीर सूज होण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in