Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत.
आनंद घ्या 'या' जोक्स
> पोलीस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड...
पोलीस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
> सासू: “कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !”
> बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)