Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक मजेदार जोक.
> जिव्हारी लागेल असा अपमान...
Employee working from home.
आई - जा बाळा , बाजारातून जरा सामान घेऊन ये...
Son - आई , आत्ता client चा काॅल आहे. नंतर जाऊ शकतो का ?
आई - *I am working on that* आणी *I will get back to you soon* एवढच बोलायच आहे ना .. मी बोलते ..
तु सामान घेऊन ये!
> पुण्यात एक विदेशी स्त्री भेटली.
म्हणाली "व्हेअर इज खत्रुड?".
मी म्हणालो
"हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड".
ती म्हणाली
"आय डोन्ट अण्डरस्टँड."
तिने कागद दाखवला त्यावर लिहिले होते KOTHRUD
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)