Joke of The Day: पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.
Latest Marathi Joke
Viral Jokes In MarathiFreepiik
Published on

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.

चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.

पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.

Latest Marathi Joke
World Emoji Day 2024: इमोजी आणि स्माईल पिवळ्या रंगाचे का असतात? जाणून घ्या रंजक माहिती

> ​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,

त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,

कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..

Latest Marathi Joke
Joke of The Day: जेव्हा विशाल असाइनमेंट न करता शाळेमध्ये पोहचतो तेव्हा...

> तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,

तर अविवाहित असतांना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण

बदलू शकत नाही.

Latest Marathi Joke
Joke of The Day: नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते...

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

logo
marathi.freepressjournal.in