
Vitamin B12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेले व्हिटामिन आहे. हे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. याशिवाय, ते मज्जासंस्था मजबूत करण्यास देखील उपयुक्त आहे. याच्या कमतरतेमुळे (Vitamin B12 deficiency) आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये विशेषकरून हाडांशी रिलेटेड आजार खूप असतात. जाणून घ्या Vitamin B12 शरीरासाठी इतके आवश्यक का आहे? याच्या कमतरतेमुळे काय आजार होऊ शकतात? तसेच आहारात एक छोटासा बदल केल्याने तुम्हाला Vitamin B12 चा Booster Dose कसा मिळेल.
अखेर का आहे Vitamin B12 एवढे महत्त्वाचे?
Vitamin B12 आपल्यासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचे आहे. संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. याशिवाय, मेंदू आणि पाठीच्या कण्यासारख्या मज्जासंस्थेला निरोगी बनवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय, डीएनए संश्लेषण आणि अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी Vitamin B12 (Vitamin B12 deficiency remedy) देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शरीरात त्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
काय आहेत Vitamin B12 च्या कमतरतेची लक्षणे
खूप थकलेले किंवा अशक्त वाटणे
हात आणि पाय मुंग्या येणे
गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणे
त्वचा पिवळी पडणे
मळमळ
भूक न लागणे
वजन कमी होणे
तोंडात किंवा जीभेत वेदना
दृष्टी समस्या
उदास वाटणे
चिडचिड
Vitamin B12 मिळवण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा
आहारातून Vitamin B12 मिळवण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. विशेष करून दही. दही हा Vitamin B12 चा सर्वात मोठा स्रोत आहे. तसेच दह्यातून Vitamin B12 मिळवण्यासाठी त्यात काही छोट्या गोष्टी मिसळून खाल्ल्यासही मोठा फायदा होतो.
गव्हाच्या पिठात एक छोटी गोष्ट मिसळा आणि मिळवा Vitamin B12 चा Booster Dose
गव्हाचे पीठ मळताना त्यात एक छोटा चमचा भरून यीस्ट मिसळावे. यीस्ट हे Vitamin B12 चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तुम्हाला रोजच्या आहारातून Vitamin B12 चा Booster Dose मिळेल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)