कांचीपूरम सिल्क साडी आणि दुर्मिळ दक्षिण भारतीय पेंडंट; ट्रम्प यांच्या रिसेप्शनमध्ये नीता अंबानींनी पेहरावातून मांडले भारतीय संस्कृतीचे वैभव

अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, वॉशिंग्टनमधील खासगी रिसेप्शनमध्ये रविवारी रिलायन्सचे इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश आणि नीता अंबानी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या पेहरावाने अनेकांना आकर्षित केले. तर नीता अंबानी या त्यांच्या कांचीपूरम साडीमुळे प्रकाशझोतात आल्या.
कांचीपूरम सिल्क साडी आणि दुर्मिळ दक्षिण भारतीय पेंडंट; ट्रम्प यांच्या रिसेप्शनमध्ये नीता अंबानींनी पेहरावातून मांडले भारतीय संस्कृतीचे वैभव
कांचीपूरम सिल्क साडी आणि दुर्मिळ दक्षिण भारतीय पेंडंट; ट्रम्प यांच्या रिसेप्शनमध्ये नीता अंबानींनी पेहरावातून मांडले भारतीय संस्कृतीचे वैभवANI Social Media
Published on

रिलायन्स फाऊंडेशच्या अध्यक्षा नीता अंबानी या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेहरावामुळे नेहमीच इतरांपेक्षा उठून दिसतात. त्यांच्या फॅशन सेन्स आणि अभिजात सौंदर्यामुळे त्या प्रत्येक आपोआपच 'स्पॉटलाइट'मध्ये येतात. त्यांचे साडीवरील प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पेहरावातून भारतीय संस्कृतीचे वैभव मांडले आहे. अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (२० जानेवारी) राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, वॉशिंग्टनमधील खासगी रिसेप्शनमध्ये रविवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या पेहरावाने अनेकांना आकर्षित केले. विशेष करून नीता अंबानी यांनी नेसलेली साडी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'फॅशन स्टेटमेंट' ठरत आहे. नीता अंबानी यांनी यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील इव्हेंटमध्ये साडी नेसून भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. नीता अंबानी यांच्याकडे असलेल्या साडी कलेक्शनची लाईफ स्टाईल आणि फॅशनच्या जगात मोठी चर्चा असते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता कारागील बी. कृष्णमूर्ती यांनी विणली कांचीपूरम सिल्क साडी

ट्रम्प यांच्या रिसेप्शन सोहळ्यात नीता अंबानी या खास काळ्या रंगाच्या डिझाइनर साडीत दिसून आल्या. स्वदेश निर्मित कांचीपूरम सिल्क साडीत नीता अंबानींचे सौंदर्य खुलून दिसत होते. तसेच या साडीवरील कलाकृती या आकर्षक ठरत होत्या. ही साडी राष्ट्रीय पुरस्कार विजेता मास्टर कारागीर बी. कृष्णमूर्ति यांनी डिझाइन करून विनली आहे. ही साडी विनताना त्यावरील नक्षीकाम कलाकृती अतिशय बारकाईने अभ्यास आणि संशोधन करून विणण्यात आले आहेत. तसेच दक्षिण भारतीय मंदिरांवरील नक्षीकामाचे प्राचीन वैभव साडीमध्ये आणण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. या साडीवर दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये चित्रीत लोककथेतील विशेष दैवतांना चित्रित करण्यात आले आहे. अंबानी यांच्या या साडीतून कांचीपूरम येथील लोककथांचे सांस्कृतिक महत्वच जणू साकारण्यात आले आहे.

इरुथलाईपाक्षी, मायिल, पौराणिक सोर्गवासल पशु पगचिह्न

या कांचीपूरम साडीत दक्षिण भारतीय लोककथेतील प्रसिद्ध इरुथलाईपाक्षी (भगवान विष्णूंचे प्रतिक किंवा अवतार असलेला दोन तोंडी गरुड) अमरता और दिव्यतेचे प्रतिनिधित्व करणारा मायिल तसेच पौराणिक सोर्गवासल पशु पगचिह्न अतिशय कलात्मक पद्धतीने विणण्यात आले आहे. नीता अंबानी यांनी आपल्या पेहरावातून भारतीय लोककथांतील हे वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहे.

दक्षिण भारतीय 200 वर्षांचा दुर्मिळ पेंडंट

या कांचीपूरम साडीसोबत त्यांनी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला वेल्वेटचा संपूर्ण बाह्यांचा आणि बंद गळ्याचा ब्लाऊज घातला होता. या ब्लाऊजची नेकलाइन आणि बाह्यांचे गोट हे आकर्षक मण्यांनी सजवले होते.

नीता अंबानी आपल्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनसाठीच नव्हे तर त्यासोबत परिधान केल्या जाणाऱ्या त्यांच्या आभूषणांबाबत देखील तितक्याच प्रसिद्ध आहेत. कांचीपूरम साडीसोबत त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण पेंडंट घातला होता. हा पेंडंट दक्षिण भारतात निर्मित 200 वर्ष जूना पोपटाच्या आकारातील होता. जो या साडी आणि ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसत होता. खास रत्नांचा वापर करून हे पेंडंट साकारण्यात आले आहे. त्यामध्ये रूबी, पन्ना, हिरे, मोती आणि सोनेरी कुंदन जडवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in