बेसावध राहाल, तर तुमचा स्मार्टफोनही करू शकतो घात; आपला फोन ठेवा स्मार्ट आणि सुरक्षित

सध्या प्रत्येकजण मोबाईल फोनधारक आहे आणि या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हाच हुकमी मार्ग सायबर गुन्हेगारांसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना फसवण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग वापरले जात आहेत आणि कळत-नकळत त्यात अडकल्यानंतर कशी सुटका करून घायची, हा मोठा प्रश्न पीडितांसमोर उभा रहात आहे.
बेसावध राहाल, तर तुमचा स्मार्टफोनही करू शकतो घात; आपला फोन ठेवा स्मार्ट आणि सुरक्षित
Published on

मुंबई : सध्या प्रत्येकजण मोबाईल फोनधारक आहे आणि या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हाच हुकमी मार्ग सायबर गुन्हेगारांसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना फसवण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग वापरले जात आहेत आणि कळत-नकळत त्यात अडकल्यानंतर कशी सुटका करून घायची, हा मोठा प्रश्न पीडितांसमोर उभा रहात आहे.

आपला मोबाईल फोन हाच सायबर गुन्हेगारांना आपली फसवणूक करण्यासाठीचे सर्वात मोठे माध्यम आहे. फसवणूक करणारे स्कॅमर डेटा आणि पैसे चोरण्यासाठी बनावट कॉल, धोकादायक ॲप्स आणि ‘सिम’शी संबंधित फसवणुकीचा वापर करतात. स्कॅमर अनेकदा स्वतःला कायदेशीर एजन्सी असल्याची बतावणी करत वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती शेअर करण्यास भाग पाडतात. आता तर ‘एआय’च्या सहाय्याने आपल्या ओळखीच्या व्यक्तीचाही आवाज काढून स्कॅमर फसवणूक करू शकतात.

केवळ आपल्याकडील असलेला स्मार्ट फोनच नव्हे तर स्कॅमरकडे असलेला त्याचा स्मार्ट फोनही आपल्याला गंडा घालू शकतो. काही स्कॅमरच्या एकाच फोनमध्ये ‘फोन पे’सारखी ॲप ओरिजिनल आणि ड्युप्लिकेट अशी दोन प्रकारची असतात. हे स्कॅमर खरेदी करून झाल्यावर ड्युप्लिकेट ॲपमधून पैसे देतात. प्रत्यक्षात ते पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात गेलेलेच नसतात. म्हणून फोनमध्ये काय दिसते त्यापेक्षा आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

काही कंपन्या कमी किमतीत स्मार्टफोन देण्याचे आश्वासन देतात. पण प्रत्यक्षात ते बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे असतात. ते आवश्यक ती सुरक्षा देऊ शकत नाहीत. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपला फोन वापरू देऊ नका. काहीतरी बहाण्याने तुमच्याकडून फोन घेऊन बोलत असताना ते स्कॅम करू शकतात.

काय कराल?

  • फोन चोरीला गेल्यास तक्रार नोंदवा : हरवलेले किंवा चोरीला गेलेल्या फोनची ताबडतोब पोलिसात तक्रार करा आणि संचार साथीला कळवा.

  • अज्ञात स्त्रोत टाळा : सोशल मीडिया ग्रुप्स किंवा अनोळखी स्त्रोतांवर प्राप्त झालेले ॲप्स डाउनलोड करणे टाळा.

  • सिम नोंदणी तपासा : तुमच्या नावाखाली नोंदणीकृत ‘सिम’ची संख्या नियमितपणे तपासा.

  • ‘स्पॅम कॉल्स’ची तक्रार करा : ‘स्पूफिंग कॉल्स’ची तक्रार करा आणि ‘स्पॅम कॉल’ ब्लॉक करण्यासाठी नोंदणी करा.

  • फक्त खात्रीशीर स्टोअर्स वापरा : फक्त प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरसारख्या अधिकृत स्टोअर्समधून ॲप्स डाउनलोड करा.

काय टाळाल?

  • ‘सिम’ मर्यादा तपासा : तुम्ही ९ ‘सिम’ची परवानगी असलेली मर्यादा ओलांडत नाही याची खात्री करा.

  • ‘स्पॅम कॉल्स’कडे दुर्लक्ष करा : कधीही ‘स्पॅम कॉल्स’मध्ये सहभागी होऊ नका. ते ताबडतोब ब्लॉक करा.

  • अनावश्यक ‘सिम कनेक्शन’ काढून टाका : तुमच्या नावावर नको असलेले ‘सिम कनेक्शन’ ठेवू नका.

  • ‘आयएमइआय’ नंबरचा मागोवा ठेवा : ‘संचार साथी’ पोर्टल वापरून तुमच्या ‘आयएमइआय’ नंबरची नोंद ठेवा.

  • व्हॉटस्ॲप सेटिंग्ज बदला : ‘स्कॅम कॉल’ टाळण्यासाठी व्हॉटस्ॲपवर 'सायलेन्स अननोन कॉलर्स' सुरू ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in