जाणून घ्या 'कांदा' खाण्याचे फायदे

कांदा हे एक सुपरफूड आहे. त्याला 'पॉवर हाऊस ऑफ एनर्जी' असंही म्हणतात. तेव्हा जाणून घेऊ या हिवाळ्यात कांदा खाण्याचे विशेष फायदे
जाणून घ्या 'कांदा' खाण्याचे फायदे

रोजच्या आहारात आरोग्यसंपन्न घटकांचा समावेश करावा याकडे अनेकांचा कल वाढतो आहे, पण रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाण्याऱ्या कांदाचे महत्त्व तुम्हाला माहीती आहे का? कांंदा हा बहुगुणकारी मानला जातो, कांद्याच्या सेवनाने शरीरातील अनेक आजार कमी होतात, किचनमध्ये असणारा कांदा अगदी सढळ हाताने वापरला तरी काहीही हरकत नाही, कारण कांदा हे एक सुपरफूड आहे. त्याला 'पॉवर हाऊस ऑफ एनर्जी' असंही म्हणतात. तेव्हा जाणून घेऊ या हिवाळ्यात कांदा खाण्याचे विशेष फायदे

कांद्यामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याचे गुणधर्म असतात. म्हणूनच कांदा खाल्ल्याने सर्दी, खोकला, तापापासून आराम मिळतो. हिवाळ्यात कानात आवाज येण्याची तक्रार असणाऱ्यांनीही दररोज कच्चा कांदा खावा. यामुळे कानातला आवाज थांबतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात दररोज मध्यम आकाराचा एकतरी कांदा खावा.

हिवाळ्यात हात-पायांच्या सांध्यातील लवचिकता कमी होते. शरीरात रक्ताभिसरणही कमी होते. त्यामुळे पेटके येणे, दुखणे या तक्रारी उद्भवतात. कांद्यामध्ये मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात.यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.चिरलेल्या एका कांद्यामधून १३ टक्के व्हिटॅमिन सी मिळते. हे अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करते. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, कांदा नियमित खाल्ल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. कांद्यामध्ये ऑर्गनोसल्फर संयुगे आढळतात. यापैकी काही ऑर्गनोसल्फर ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करतात यामध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात.

थंड पाणी प्यायल्यानंतर दातांचे दुखणे वाढते. अशा स्थितीत कांदा रामबाण औषधाचे काम करतो. दररोज कच्चा कांदा खाणे हा दातांसाठी चांगला व्यायाम आहे. या उपायाने हिरड्यांमध्ये संसर्ग होत नाही. तर कांदा केसांच्या समस्येवरही रामबाण औषध म्हणून वापरतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in