जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे शरीराला होणारे फायदे

सोयाबीन खाण्याने तुमच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे फायदे
जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे शरीराला होणारे फायदे

सोयाबीन हे प्रोटिन्सयुक्त आणि अनेक पोषक घटकांनी परीपुर्ण असणारे अन्नपदार्थ आहे. शाकाहारी लोकांसाठी ते अतिशय पोषक ठरते. यासाठी सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीनपासून बनवलेले इतर पदार्थ आहारात असायला हवे. सोयाबीन खाण्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. सोयाबीनमध्ये प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते, मधुमेहींसाठी सोयाबीन खाणं सोयाबेन तेलाचे फायदे खूपच फायदेशीर ठरतं. एवढंच नाही सोयाबीन खाण्याने तुमच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे फायदे

सोयाबीन खाण्याचे फायदे

 1. झोपेच्या समस्या

  सोयाबीन सेवनामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते. सोयाबीनमध्ये अनिद्रेच्या लक्षणांना दूर करणारे गुणधर्म असतात. सोयाबीनमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशिअम आहे. ज्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते आणि शरीराला चांगला आराम मिळतो.

 2. मॅनोपॉझमध्ये आराम मिळतो

  सोयाबीन खाण्यामुळे तुमच्या मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात त्याचप्रमाणे मॅनोपॉझमध्येही आराम मिळतो. कारण सोयाबीनमुळे शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी संतुलित राहते. जर एस्ट्रोजीनची पातळी कमी झाली तर महिलांना मासिक पाळीत अथवा मॅनोपॉजच्या काळात अंगदुखी सारखे अनेक त्रास जाणवतात. महिलांना मॅनोपॉझच्या काळात खूप त्रास होतो. मात्र जर तुमच्या आहारात सोयाबीन असेल तर मॅनोपॉझची लक्षणे कमी प्रमाणात जाणवू शकतात.

 3. मधुमेह नियंत्रित राहतो

  मधुमेहींच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या ह्रदय, किडनी, मेंदूवर होऊ शकतो. सोयाबीन खाण्यामुळे मधुमेंहीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित तर राहतेच शिवाय त्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.

 4. रक्ताभिसरण सुधारते

  सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे.

 5. गरोदरपणात उपयुक्त

  सोयाबीनमध्ये फॉलिक अ‍ॅसिड आणि बी कॉप्लेक्स भरपूर प्रमाणात असते. जे गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीराला आवश्यक असते. गर्भवती महिलांनी सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास त्यांच्या शरीराला हे पोषक घटक मिळतात. गर्भाच्या वाढ आणि विकासासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी गर्भवती महिलांच्या आहारात सोयाबीन असायला हवे.

 6. ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते

  सोयाबीन खाण्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच कार्य सुरळीत होत नाही. सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीराला याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात अवश्य वापर करावा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in