पौष्टिक आणि स्वादिष्ट मसालेदार ‘तोंडलीचा भात’ एकदा 'घरच्या घरी' बनवून बघाचं

आज आपण पौष्टीक, मसालेदार ‘तोंडलीचा भात’ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
पौष्टिक आणि स्वादिष्ट मसालेदार ‘तोंडलीचा भात’ एकदा 'घरच्या घरी' बनवून बघाचं

तोंडलीची भाजी खाण्याचा तुम्हालाही कंटाळा येतो का?. तोंडली शरीरासाठी अत्यंत फायद्याची असते, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत तोंडली खाणे आरोग्यासाठी खूप ठरते. तर आज आपण पौष्टीक, मसालेदार ‘तोंडलीचा भात’ कसा बनवायचा याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य :

 • अर्धा किलो तोंडली (उभी कापून घ्या)

 • एक चमचा आलं, लसूण, मिरचीची पेस्ट

 • दोन चमचे तूप

 • हिंग

 • १/२ चमचा हळद

 • आंबेमोहोर तांदूळ किंवा बासमती राईस सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

 • काजू ७ ते ८

 • हिरव्या मिरच्या ७ ते ८

 • किसलेलं खोबरं

 • लिंबाचा रस

 • बारीक चिरलेली कोथिंबीर

 • आवडीनुसार गोड मसाला वापरू शकता.

 • मीठ

  कृती :

  सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात तांदूळ घेऊन ते पाण्यांत तीन ते चार तास भिजत घालावेत.

  त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आलं, हिरव्या मिरची, कोथिंबीर घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.त्यानंतर एक दुसरे मोठे भांडे घ्या. त्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्या.

  नंतर त्यात हिंग, हळद, पाण्यात भिजत घातलेला तांदूळ आणि बारीक करून घेतलेली पेस्ट घालून घ्या.तसेच मिश्रणात चिरून घेतलेली तोंडली, भिजवून घेतलेलं काजू, चवीनुसार मीठ, पाणी घालून घ्या आणि मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या.तर आता भांड्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे एक वाफ येऊ द्या. या वाफेवर भात शिजवून घ्या.

  भात शिजवून घेतल्यावर त्यात लिंबाचा रस, थोडं तूप (आवडीनुसार) किसलेलं खोबरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्या.

  अशाप्रकारे तुमचा ‘तोंडली भात’ तयार.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in