पोहे खाऊन वजन कमी होते?

प्रत्येकाच्या घरात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ला जाणारा आवडीचा पदार्थ म्हणजे पोहे.
पोहे खाऊन वजन कमी होते?
Published on

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला उत्तम आरोग्य हवे असते. जेणेकरून आरोग्यासंबंधित कोणतेही आजार दूर राहण्यास मदत होईल. मात्र आजकाल बदलती जीवनशैली पाहता व्यक्तीला कामातून वेळ काढणे फार कठीण होत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही जण लठ्ठपणाची लक्षणे दिसतात. असे झाल्यास त्यावर उपाय म्हणून विविध औषधे घेणे, जिम लावणे असे प्रकार केले जातात. तरीही वजन कमी होत नाहीय. तर वजन कमी करण्यासाठी पोहे नक्की खा. कारण पोहे बनवण्यासाठी दिवसभरातील अवघी १० मिनिटे खर्चिक घालावी लागणार आहेत. त्याचसोबत पोह्यांमध्ये असलेल्या पौष्टिक गुणांमुळे तुम्हाला वजन नियंत्रात ठेवणे सोईस्कर होऊ शकते. पण खरंच पोहे खाल्ल्यावर वजन कमी होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना. तर आज आम्ही तुम्हाला पोहे खाल्ल्याने काय फायदे होतात आणि कशाप्रकारे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते ते सांगणार आहोत.

प्रत्येकाच्या घरात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ला जाणारा आवडीचा पदार्थ म्हणजे पोहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना पोह्यात कांदा, खोबरे, शेंगदाणे किंवा कोथिंबीर असेल तर ते पाहिल्यावरच तोंडाला पाणी सुटते. पोहे चवीला तर छान असतात पण त्याचे फायदे सुद्धा तेवढेच आहेत. पोहे प्रामुख्याने रक्तप्रवाहातून ग्लुकोज रिलीज करतात. त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. तसेच पोहे पचण्यास हलके असून थोडे सुद्धा खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते. फायबर भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोह्यांमध्ये ७५ टक्के कार्बोहायड्रेट्स, २३ टक्के फॅट्स आणि ८ टक्के प्रोटीन समावलेले असते. त्याचसोबत आर्यन, व्हिटमिन अ,उ,ऊ सह अन्य खनिजे असल्याचे त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्यांचा समावेश करत असाल ते फायदेशीर ठरणार आहे. तसेच नाश्त्यामध्ये जंकफूडचा समावेश न करता हेल्दी पदार्थ खा. यामुळे तुमच्या आरोग्यासह वजन सुद्धा स्थिर राहण्यास मदत होईल.

logo
marathi.freepressjournal.in