घरच्या घरी बनवा लुसलुशीत, मलईदार थंडगार मॅंगो लस्सी

घरच्या घरी बनवा लुसलुशीत, मलईदार थंडगार मॅंगो लस्सी

नेहमीच्या लस्सीला एक छान टेस्ट देत तुम्ही देखील घरी मॅंगो केसर लस्सी ट्राय करू शकता.

उष्णतेचा पारा वाढायला सुरूवात झाली की, उष्णतेपासून वाचण्यासाठी घरातच संतुलित आहार आणि पुरेसं पाणी पिण्याची गरज असते. हायड्रेट राहण्यासाठी पाण्यासोबत सरबत, ताक, लस्सी, पन्हं अशी थंडगार पेयं सोबत असतील तर उकाडा सुसह्य होतो. खंर सांगायचं झालं तर प्रत्येकाला या काळात काही तरी थंडगार सतत प्यावं असं वाटत असतं. त्यामुळे घरात राहून नवनवीन गोष्टी बनवणं फायदेशीर आहे. तर या उन्हाळ्यात घरच्या घरी थंडगार मॅंगो लस्सी बनवा.दाट आणि मलईदार लस्सी घरी बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. आजकाल लस्सीमध्ये निरनिराळे प्रकार बाजारात मिळतात. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी आंब्याची पेटी आलेलीच असते. त्यामुळे नेहमीच्या लस्सीला एक छान टेस्ट देत तुम्ही देखील घरी मॅंगो केसर लस्सी ट्राय करू शकता. यासाठी फॉलो करा ही रेसिपी

साहित्य – 

  • एका आंब्याचा गर

  • एक वाटी दही

  • गरजेनुसार साखर

  • वेलची पूड

  • दूधात भिजवलेलं केसर

मॅंगो लस्सी बनवण्याची कृती –

  • सर्वात आधी आंब्याचा गर काढून घ्या.

  • ब्लेंडरमध्ये आंब्याचा गर आणि दही धुसळून एकजीव करा.

  • त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि केशर दूध टाका.

  • पुन्हा एकदा सर्व साहित्य घुसळून घ्या.

  • सर्व्ह करताना ग्लासात बर्फ टाकून त्यावर लस्सी टाका.

  • मलई, केशर आणि आंब्याच्या फोडीने ग्लास सजवा.

    लस्सी पिण्याचे फायदे

तुम्ही रोझ सिरप, केसर, खस, ड्रायफ्रूट्स असे अनेक फ्लेव्हर्स वापरून लस्सीचे निरनिराळे प्रकार बनवू शकता. मात्र त्यासाठी जाणून घ्या लस्सी पिण्याचे फायदे

  • लस्सी पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, कारण दह्यामधून तुमच्या पोटाला पुरेसं प्रोबायोटिक्स मिळतात.

  • दह्यापासून ताक अथवा लस्सी बनण्यासाठी ते घुसळावे लागते या प्रोसेसमध्ये निर्माण होणारे पोषक घटक शरीरासाठी फायद्याचे असतात.

  • उन्हाळ्यात शरीरात तयार होणारी उष्णता कमी होते आणि शरीराला पुरेसा थंडावा मिळतो.

  • नियमित लस्सी अथवा ताक पिण्यामुळे तुमच्या शरीरात चांगल्या जिवाणूंची वाढ होते ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास कमी होतो. 

  • दह्यामधील कॅल्शिअममुळे तुमच्या हाडांचा विकास होतो. 

  • दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

logo
marathi.freepressjournal.in