नाश्त्याला बनवा कुरकुरीत दुधी भोपळ्याचा डोसा, पाहा सोपी रेसिपी

आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा दुधी भोपळा सर्वांनाच आवडतो असे नाही. मात्र, हा दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
नाश्त्याला बनवा कुरकुरीत दुधी भोपळ्याचा डोसा, पाहा सोपी रेसिपी

आपल्या आरोग्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. पण दुधी भोपळा सर्व लोकांना आवडतो असे नाही. हा दुधी भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पोटासाठी चांगला असणारा हा दुधी भोपळा आरोग्यासाठी तेवढाच खूप लाभदायी आहे. भोपळ्यापासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. दुधी भोपळ्याची भाजी, रायता, हलवा आणि थालीपीठ या सारखे अनेक पदार्थ या दुधी भोपळ्यापासून बनवले जातात. जर आपण दुधी भोपळ्याचे सेवन केले तर वजन देखील कमी होते. असच आज तुम्हाला आम्ही दुधी भोपळ्याची एक खास रेसिपी सांगणार आहोत.

ही रेसिपी भोपळ्यची ही रेसिपि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट आहे. या रेसिपीचे नाव आहे दुधी भोपळ्याचा डोसा अशी आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही भोपळ्याच डोसा नक्कीच बनवू शकता. चला जाणून घेऊया या सोप्या रेसिपीबद्दल.

साहित्य -

-अर्धा कप किसलेला दुधी भोपळा

-१/२ कप तांदळाचे पीठ

-१/२ कप रवा

-३-४ हिरव्या मिरच्या

-चवीनुसार मीठ

डोसा बनवण्याची योग्य पद्धत -

- सर्वप्रथम आधी किसलेला दुधी भोपळा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

-हे मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडेसे पाणी मिसळून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या.

-आता ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. आणि त्या भांड्यात आता तांदळाचे पीठ, रवा, हिरवी मिरची, मीठ आणि थोडेसे पाणी घाला.

-डोस्याचे बॅटर बनवण्यासाठी आता हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.

-हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र झाल्यानंतर हे बॅटर १५ मिनिटे झाकून ठेवा.

-आता दुसरीकडे बाजूला डोसा पॅन गॅसवर गरम करायला ठेवून द्या.

-पॅन गरम झाल्यानंतर त्यात गरमागरम डोसे काडून घ्या.

-आता खोबऱ्याच्या चटणी किंवा सॉससोबत हा कुरकुरीत डोसा सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in