आपल्या चेहऱ्यावर कितीही सुंदर मेकअप केला, तरीही डोळ्यात जो पर्यंत काजळ लावत नाही तो पर्यंत मेकअप पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही. आपल्या डोळ्यांना एक वेगळीच चमक येते. डोळे अधिक पाणीदार आणि टपोरे दिसतात. बाजारामध्ये आपल्याला सध्या कितीतरी प्रकार आणि रंगांचे काजळ उपलब्ध आहेत. अशा वेळेस तुम्ही घरी सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने काजळ बनवू शकतो.
काजळ कसे बनवू शकता-
साहित्य-
तिळाचे तेल किंवा तूप – २ चमचे
बदाम – ४ ते ५ अथवा बदामाचे तेल – एक चमचा
एरंडेल तेल – १ चमचा
सिरॅमिक किंवा स्टीलची छोटी वाटी
सुती कापड/ कापूस
काड्यापेटी/ पणती किंवा मेणबत्ती
तुम्ही काजळ बनवण्यासाठी बदामाचा वापर करणार असाल तर प्रथम बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या बदामाची साले बाजूला करा आणि बदाम वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करा.
कृती-
- स्टीलच्या वाटीमध्ये तयार केलेली बदामाची पेस्ट अथवा बदामाचे तेल घालून घ्यावे.
-त्यामध्ये वाटीत तिळाचे तेल किंवा तूप घालून सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
-आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये एरंडेल तेल घालून पुन्हा सर्व गोष्टी मिक्स करा.
-तयार मिश्रण मंद आचेवर गरम करून घ्या.
-मिश्रण गरम करताना ते घट्ट होईपर्यंत सारखे ढवळत राहा.
-या प्रक्रियेला १० ते १५ मिनिटे लागतात.
-मिश्रणाचा रंग बदलल्यानंतर आणि त्याला घट्टपणा आल्यानंतर वाटीतील काजळाचे मिश्रण थोडे थंड होण्यास बाजूला ठेवा.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.