जीवनशैलीत करा हे छोटे बदल; टाळू शकता हृदयरोगांचा धोका

इथे काही जीवनशैलीतील प्रमुख बदल दिले आहेत. ज्याचा तुमच्या जीवनशैलीत अवलबं करून तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात. त्याचप्रमाणे हृदय आमि रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका कमी करू शकतात.
जीवनशैलीत करा हे छोटे बदल; टाळू शकता हृदयरोगांचा धोका
प्रातिनिधिक छायाचित्र FreePik
Published on

संपूर्ण जगात हृदय विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे लक्षणीय आहे. यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात. मात्र, तुमच्या जीवनशैलीतील छोट्या-छोट्या सवयी बदलून हृदयासंबंधित रोगांचा धोका कमी करू शकता. विशेष म्हणजे तुमची जीवनशैली कितीही व्यस्त असेल तरी तुम्ही हे बदल करू शकता. यामध्ये आहार, व्यायाम, ताण, व्यवस्थापन आणि इतर निरोगी सवयींचा समावेश होतो. इथे काही जीवनशैलीतील प्रमुख बदल दिले आहेत. ज्याचा तुमच्या जीवनशैलीत अवलबं करून तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात. त्याचप्रमाणे हृदय आमि रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका कमी करू शकतात.

निरोगी आहार स्वीकारणे

निरोगी आहाराचा स्वीकार करणे हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते. सामान्यपणे आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश याशिवाय प्रथिने असलेला वनस्पतीजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास मदत होते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि शेंगदाण्यांचे अधिक सेवन करून फायबरचे सेवन वाढवल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास आणि रक्तदाब सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे दीर्घकालीन हृदय आरोग्यासाठी एक मजबूत पाया तयार होतो. रक्तदाब योग्य राखण्यासाठी सोडियमचे सेवन कमी केले पाहिजे कारण जास्त सोडियमचे सेवन उच्च रक्तदाबाशी जवळून संबंधित आहे, जो हृदयरोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे. त्यासाठी मीठ कमी करणे आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. त्याचप्रमाणे, अतिरिक्त साखरेचे सेवन कमी करणे, विशेषतः साखरेचे पेये आणि स्नॅक्स, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इन्सुलिन प्रतिरोध रोखण्यासाठी महत्वाचे आहे. आहारातील हे साधे बदल हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते.

वजनावर नियंत्रण ठेवणे आणि शारीरिक हालचालींचे कार्य वाढवणे

अतिरिक्त वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा हा देखील हृदयरोगासाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे. वजन वाढल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉलची शक्यता वाढवते. वजन नियंत्रित करण्यासाठी आहार नियमन करणे आणि योग्य व्यायाम यांच्या संतुलनातून वजनावर नियंत्रण राखता येते. सामान्यपणे शरीराची हालचाल होईल अशा कामांचा जीवनशैलीत अंगीकार करावा. जसे की बागकाम करणे, पायऱ्या चढणे, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे या गोष्टी नियमित केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.

ताण आणि झोपेचे व्यवस्थापन

दीर्घकालीन ताण हृदयरोगाशी संबंधित आहे आणि म्हणूनच, हृदयाच्या आरोग्यासाठी तणावाचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. ध्यान, योग आणि दीर्घ श्वास घेण्यासारख्या तंत्रांमुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच चांगली झोप देखील महत्त्वाची आहे, कारण कमी झोपेमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. दररोज रात्री ७-९ तासांची गाढ झोप घेण्याचे लक्ष्य ठेवल्याने बरे होण्यास मदत होते आणि ताण कमी होतो.

व्यसन टाळण्याचा प्रयत्न करणे

शक्य तितक्या प्रमाणात तंबाखू आणि अल्कोहोल टाळणे हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. धूम्रपान रक्तवाहिन्यांचे नुकसान करते आणि रक्त गोठण्याच्या प्रमाणात वाढ करतो. धूम्रपान सोडल्याने, रक्ताभिसरण सुधारणे आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होणे असे फायदे लगेच सुरू होतात.

आहार, व्यायाम, वजन व्यवस्थापन आणि ताण कमी करण्यात विचारपूर्वक बदल करून, व्यक्ती त्यांच्या हृदयाचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in