33.85km मायलेज, किंमत 3.99 लाखांपासून सुरू; Maruti ची सर्वात स्वस्त कार होणार महाग, खरेदी करण्याची आताच योग्य वेळ!

वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आपल्या पोर्टफोलियोमधील सर्व कारच्या किंमती वाढवणार असल्याचे कंपनीने गुरूवारी जाहीर केले.
33.85km मायलेज, किंमत 3.99 लाखांपासून सुरू; Maruti ची सर्वात स्वस्त कार होणार महाग, खरेदी करण्याची आताच योग्य वेळ!
Published on

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लवकरच ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आपल्या पोर्टफोलियोमधील सर्व कारच्या किंमती येत्या १ फेब्रुवारीपासून १, ५०० ते ३२,५०० रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचे कंपनीने गुरूवारी जाहीर केले. त्यामुळे कंपनीची सर्वात स्वस्त कार Maruti Suzuki Alto K10 च्या किंमतीतही वाढ होणार आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त ३.९९ लाख रुपये आहे. पण, कंपनी किमतीत १९,५०० रुपयांनी वाढवणार आहे. वाढलेली किंमत १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल. त्यामुळे स्वस्तात कार खरेदी करण्याची तुमच्याकडे ही चांगली संधी आहे. किंमत वाढण्याआधी तुम्ही ही गाडी खरेदी करु शकता. जाणून घेऊया मारुती सुझुकी अल्टो K10 ची किंमत, वैशिष्ट्ये, मायलेज आणि इंजिनबाबत...

Maruti Suzuki Alto K10 व्हेरिअंट आणि किंमत: ही कार चार प्रकारांमध्ये (Std, LXi, VXi आणि VXi Plus) विकली जाते. बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिअंटची किंमत ५.९६ लाख रुपयांपर्यंत जाते.

Maruti Suzuki Alto K10 इंजिन: या कारमध्ये १-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67 PS आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड एएमटी पर्यायांसह येते. याशिवाय ही कार सीएनजी पॉवरट्रेनसह विकली जाते. यामध्येही पेट्रोल कारमधीलच इंजिन देण्यात आले असून ते 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 57 PS आणि 82 Nm च्या आउटपुटसह उपलब्ध आहे. याशिवाय, निष्क्रिय इंजिन स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञान देखील CNG प्रकारात दिले आहे.

Maruti Suzuki Alto K10 मायलेज: ही कार 5-स्पीड पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 24.39 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 24.90 kmpl, तर सीएनजी पर्ययाामध्ये 33.85 km/kg पर्यंत मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

Maruti Suzuki Alto K10 फीचर्स: या कारमध्ये मॅन्युअली अॅड्जस्टेबल आउटसाइड रियर व्ह्यू मिरर (ORVMs),७-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, की-लेस एंट्री, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, एक रिव्हर्सिंग कॅमेरा, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग सेंसर असे फीचर्स आहेत.

logo
marathi.freepressjournal.in