
कांदा हा आपल्या आहारातील प्रमुख घटक आहे. कांद्यामुळे शरिराला गारवा मिळतो. जळजळ कमी होते. कांदा भाजीची चव वाढवणारा घटक आहे. यामुळे भाजी चविष्ट होते. शिवाय कांदा सॅलड म्हणून कच्चा देखील खाल्ला जातो. मात्र, कांद्याचे याशिवाय फायदे अनेक आहेत. तसेच कांदा हा औषधी आहे. अनेक आजारांमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरते.
या आजारांमध्ये कांद्याचा रस आहे फायदेशीर
रक्तविकार
रक्तविकारांमध्ये कांदा हा खूपच उपयुक्त आहे. ५० ग्रॅम कांद्याच्या रसात १० ग्रॅम खडीसाखर आणि १ ग्रॅम भाजलेले पांढरे जिरे मिसळून खाल्ल्यास रक्तविकार दूर होतात.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या अनेकांना ही समस्या भेडसावत आहे. कांदा यावर उपयुक्त औषध आहे. आहारात कच्चा कांदा खावा. कच्च्या कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्याने अपचनाची समस्या लवकर दूर होते.
अतिसार
अतिसाराचा त्रास झाल्यावर कांदा बारीक वाटून त्याचा लेप नाभीवर लावल्याने लगेच आराम मिळतो किंवा कांदा कपड्यावर पसरवून हे कापड नाभीवर बांधून ठेवावे त्याने देखील आराम मिळतो.
कॉलरा
कॉलराच्या त्रासात कांदा अतिशय उपयुक्त आहे. कांद्याच्या रसात थोडे मीठ घालून दर एक तासाने त्याचे सेवन करावे. यामुळे लवकर फरक पडतो.
मूत्र रोगांमध्ये कांदा प्रभावी
मूत्र रोगांमध्ये कांदा हा प्रभावी आहे. एक लिटर पाण्यात १२ ग्रॅम कांद्याचे तुकडे घालून त्याचा काढा तयार करावा. हा काढा नियमित प्यायल्यानं मूत्र रोगातील समस्या दूर होतात.
केसांच्या आजारांमध्ये उपयुक्त
केसांमध्ये होणारा कोंडा, खाज सुटणे, केस गळणे, केसात उवा होणे या आजारांमध्ये कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. कांद्याचा रस केसांमध्ये चोळल्याने केस गळणे थांबतात. कांद्याचा रस तेलात उकळून हे तेल लावल्याने केसांमधील कोंडा, खाज सुटणे इत्यादी गोष्टी बंद होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)