पुरूषांनो स्वत:च्या आरोग्याला जपा..! अशी घ्या शरीराची काळजी

देैनंदिन जिवनातल्या काही जबाबदाऱ्यांंमधून वेळ काढून स्वत: साठी वेळ द्या, स्वत:च्या आरोग्याला जपा.
पुरूषांनो स्वत:च्या आरोग्याला जपा..! अशी घ्या शरीराची काळजी

दिवसभर काम काम आणि काम करणाऱ्या व्यक्तीला थोडीशी विश्रांती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. घरातल्या बारीकसारीक गोष्टींकडे जसे कुटुंबातल्या कर्त्या स्त्रीचे लक्ष असते आणि ती स्वतःकडे दुर्लक्ष करून प्रत्येक जबाबदारी पार पाडते. अगदी तशीच घरातली पुरुष मंडळीसुद्धा असतात. जबाबदाऱ्या पेलणारे पुरूष बऱ्याचदा आपल्या शरीराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी वेळ मिळतोच कुठे..? असं ही म्हणतात. स्त्रियांच्या शरीरातील काही बदल हे आजारी असण्याचे संकेत देतात, मात्र पुरुषांच्या शरीरात होणारे किरकोळ बदल हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे देैनंदिन जिवनातल्या काही जबाबदाऱ्यांंमधून वेळ काढून स्वत: साठी वेळ द्या, स्वत:च्या आरोग्याला जपा.

 • आजारांविषयी डॉक्टरांशी बोला

  उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजार असेल तर अश्या समस्या लगेचच डॉक्टरांना कळवा. त्यांच्याकडून योग्य सल्ला घेऊन उपचार करा. तसेच आनुवंशिक आजाराचे कोणतेही लक्षण आढळण्यास त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.

 • आरोग्य तपासणी करा

  आजारी असो अथवा नसो नियमित डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करणे गरजचे आहे. कारण पुरुषांनी त्यांच्या स्वत:च्या चांगल्या आरोग्याच्या काळजीसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी प्रत्येक वर्षी शारीरिक तपासणी करा. मुख्य म्हणजे यासाठी वयाची कोणतीही अट नाही. या तपासणीत कोलेस्टेरॉल, ग्लुकोज आणि रक्तदाब ह्रद्याचे ठोके तपासून घेत चला.

 • व्यायाम करा

  व्यायाम करणे ही एक चांगली सवय आहे. यामुळे नियमित सकाळी किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा. मेडीटेशन करा. पण जर तुम्हाला व्यायाम करताना कोणतीही अडचण जाणवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 • शरीराला आराम घेऊ द्या

  अनेकदा सुट्टीच्या दिवशीही काम करणे किंवा अख्खा दिवस टीव्हीसमोर घालवणे यापेक्षा एखाद छान पुस्तक वाचा, गाणी ऐका, छान कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मित्रांसोबत शतपावली करा. यामुळे तुमचं माईंड फ्रेश होईल, ताण-तणाव दुर राहील आणि मुख्य म्हणजे शरीरातील थकवा दूर होईल.

 • अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

  अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. बैचेन होणे. थकवा जाणवणे, शरीर घामाने भिजणे यासंबंधी आजारांबाबत डॉक्टरांशी बोला. त्यांचा सल्ला घ्या. अनेकदा अचानक शरीरात होणारे बदल हे घातक ठरतात. आरोग्य समस्या किरकोळ समस्यांपासून सुरू होतात. यात अस्वस्थता हि पहिली पायरी मानली जाते मानून यावर सल्ला आवश्यक आहे. भरपूर पाणी प्या.

 • मद्यपान आणि धूम्रपान थांबवा

  काही सवयी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. यात मद्यपान आणि धूम्रपान या सवयींचा समावेश आहे. वेळीच यावर रोख न मिळविल्यास अतिशय गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी व्यसनमुक्त व्हा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in