Chia Seeds Water मध्ये 'हा' पदार्थ मिसळा, वजन कमी होऊन मिळेल आकर्षक फिगर; त्वचाही होईल चमकदार

चिया सीड्स (बिया) हे वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून अनेक जण त्याचा आहारात समावेश करत आहे. चिया सीड्सचे पाणी (Chia Seeds Water) पिल्याने वजन झपाट्याने कमी होते. मात्र, चिया सिड्सच्या पाण्यात मध मिसळून ते पाणी पिल्याने वजन तर नियंत्रणात राहीलच पण तुम्हाला आकर्षक फिगर आणि चमकदार त्वचाही मिळेल.
Chia Seeds Water मध्ये 'हा' पदार्थ मिसळा, वजन कमी होऊन मिळेल आकर्षक फिगर; त्वचाही होईल चमकदार
प्रातिनिधिक छायाचित्र Freepik
Published on

काही दिवसांपूर्वीची World Obesity Day होता. लठ्ठपणा ही एक जगभरात प्रचंड मोठी समस्या बनत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. अलिकडे चिया सीड्स (बिया) हे वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून अनेक जण त्याचा आहारात समावेश करत आहे. चिया सीड्सचे पाणी (Chia Seeds Water) पिल्याने वजन झपाट्याने कमी होते. मात्र, चिया सिड्सच्या पाण्यात मध मिसळून ते पाणी पिल्याने वजन तर नियंत्रणात राहीलच पण तुम्हाला आकर्षक फिगर आणि चमकदार त्वचाही मिळेल. कसे ते जाणून घ्या.

वजन नियंत्रणात ठेवते

चिया बियांमध्ये उच्च फायबर आढळते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. चिया बियांमध्ये असलेले फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. त्यामुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहते. परिणामी अति खाणे देखील टाळता येते. याच कारणामुळे चिया बिया जलद वजन कमी करण्यास मदत करते.

मधाचा उपयोग

वजन कमी करण्यासाठी साखरेला नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. चिया सीड्समुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्यास पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी चिया बियांच्या पाण्यात मधात मिसळून ते पाणी प्यावे (Chia seeds water with honey benefits). हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

पचनसंस्था मजबूत करते

चिया बियांचे पाणी पिल्याने पचनसंस्था मजबूत होते. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि आतडे स्वच्छ करते. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी चिया बिया आणि मधाचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे पेय दररोज सकाळी प्यावे.

तुमची ऊर्जा पातळी वाढवा

चिया बियांमध्ये असलेली प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड शरीराला ऊर्जा प्रदान करतात. सकाळी चिया बियांचे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

चेहऱ्याचा रंग उजळवते

चिया बिया आणि मध हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. चिया बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम असतात. याशिवाय, ते त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करते. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवते. त्यामुळे चिया बियांच्या पाण्यात मध मिसळून ते पाणी पिल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहून आकर्षक फिगर सोबत त्वचा चमकदार राहते.

चिया बियाणे आणि मधाचे पाणी कसे बनवायचे?

चिया बियांचे पाणी बनवण्यासाठी, एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया बिया घाला आणि ते १०-१५ मिनिटे भिजवा. यानंतर, पाणी तयार झाल्यावर त्यात एक चमचा मध मिसळा आणि ते प्या.

logo
marathi.freepressjournal.in