बेढब दिसणाऱ्या 'या' फळामध्ये आहेत चमत्कारीक औषधी गुणधर्म, जाणून घ्या कोणते आहे हे फळ

बऱ्याच जणांनी या फळाचे नावही ऐकलेले नसणार, आणि पाहिलेले ही नसणार. या फळात बरेच औषधी गुणधर्म आहेत.
बेढब दिसणाऱ्या 'या' फळामध्ये आहेत चमत्कारीक औषधी गुणधर्म, जाणून घ्या कोणते आहे हे फळ

निसर्गात आढळणारी बरेच फळ हे खाण्यायोग्य असतात तर, काही फळ हे विषारी देखिल असतात. पण जंगलात आढळणाऱ्या काही फळांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. असच एक जंगली फळ ज्यात बरेच औषधी गुणधर्म आहेत. बऱ्याच जणांनी या फळाचे नावही ऐकलेले नसणार, आणि पाहिलेले ही नसणार. या फळाचं नाव आहे बडहल. हे फळ फणसाच्या जातीतील आहे. त्याला मंकी फ्रुट असेही म्हणतात. बेढभ आकाराचं हे फळ फणसाच्या कुटुंबातलं असलं तरी त्याची चव आंबट आणि गोड असते. हे फळ फक्त पावसाळ्यातचं मिळते. जसजसे फळ पिकते तसतसा त्याचा रंग हिरव्या ते फिकट पिवळा आणि गुलाबी छटासह तपकिरी होतो. बाजारातील बडहलच्या फळाची किंमत अवघी 50 रुपये आहे. मात्र या फळांमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. बडहलच्या सेवनाने पोट साफ राहते आणि शरीराला हवी असणारी ऊर्जा ही वाढते. बडहल या फळामध्ये झिंक, कॉपर, आयर्न, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. या फळाच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जातात.

हे फळ तुम्ही ते कच्चे आणि शिजवलेले दोन्ही प्रकारे खाऊ शकता. याचे नियमित सेवन केल्याने यकृताशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. त्वचा तरूण राहते. बडहल फळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्याचे काम करतात. त्वचेच्या जखमा, त्वचा वृद्ध होणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील हे फळ गुणकारी मानले जाते. पचनसंस्था सुधारते बडहल खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. या फळामध्ये भरपूर फायबर असते. बडहल खाल्ल्याने तणाव देखील कमी होण्यास मदत होते.

बडहलमध्ये असलेले पोषक तत्व रक्ताभिसरण संतुलित करतात आणि तणावमुक्त ठेवतात. हे चमत्कारी फळ नियमितपणे खाल्ल्याने मेंदूला गारवा मिळतो. त्यामुळे तणाव आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in