"ChatGPT चा वापर अवश्य करा, पण..."; मुकेश अंबानींचा तरुणाईला AI बाबत महत्त्वाचा सल्ला

Mukesh Ambani On AI : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी विद्यार्थी तसेच युवकांना AI च्या वापराबाबत अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला. ChatGPT चा वापर अवश्य करा, पण हा वापर करताना आपण त्याचे गुलाम बनणार नाही याचे भान राखा. एआयचा वापर शिकण्यासाठी एक साधन म्हणून करा मात्र याचा वापर करताना स्वतःची वैचारिक क्षमता, सृजनशीलता सोडू नका, असे ते म्हणाले. बघूया नेमकं काय म्हणाले मुकेश अंबानी?
"ChatGPT चा वापर अवश्य करा, पण..."; मुकेश अंबानींचा तरुणाईला AI बाबत महत्त्वाचा सल्ला
"ChatGPT चा वापर अवश्य करा, पण..."; मुकेश अंबानींचा तरुणाईला AI बाबत महत्त्वाचा सल्लासोशल मीडिया
Published on

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी विद्यार्थी तसेच युवकांना AI च्या वापराबाबत अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला. ChatGPT चा वापर अवश्य करा, पण हा वापर करताना आपण त्याचे गुलाम बनणार नाही याचे भान राखा. एआयचा वापर शिकण्यासाठी एक साधन म्हणून करा मात्र याचा वापर करताना स्वतःची वैचारिक क्षमता, सृजनशीलता सोडू नका, असे ते म्हणाले. बघूया नेमकं काय म्हणाले मुकेश अंबानी?

गुजरातच्या गांधीनगर येथील पंडित दीनदयाल ऊर्जा विश्वविद्यालय (पीडीईयू)च्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एआयचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी मार्गदर्शन केले. मुकेश अंबानी विद्यार्थ्यांना म्हणाले, ''आमच्या तरुण विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे. तुम्हाला शिकण्याचे साधन म्हणून एआयचा वापर उत्तमरित्या करता आला पाहिजे. मात्र, त्याचवेळी स्वतःची विचार करण्याची क्षमता सोडू नका. तुमची स्वतःची बुद्धिमत्ता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. चॅटजीपीटीचा वापर निश्चितच करा मात्र, कृत्रीम नव्हे तर स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करूनच तुम्ही भविष्यात पुढे जाऊ शकता.''

'एआय'ने नव्हे तर देश आपल्या लोकांच्या बुद्धीने प्रगती करेल

चॅटजीपीटी किंवा अन्य एआय साधने ही माणसाच्या मूळ वैचारिक क्षमतेचा पर्याय नाही. आपला देश एआयने नाही तर आपल्या लोकांच्या बुद्धीने प्रगती करेल. तंत्रज्ञान हे वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सतत शिकत राहण्याची वृत्ती असायाला हवी त्याला अन्य पर्याय नाही. स्पर्धेत टिकून राहणे आणि यशस्वी होण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे जिज्ञासू व्हा आणि सातत्याने शिकत राहणे कधीही सोडू नका, असे ते म्हणाले.

अंबानींच्या विधानाची मोठी चर्चा

मुकेश अंबानींनी विद्यार्थ्यांना संबोधित केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या भाषणातील एआय वापराच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे कारण चिनी कंपनीने एआयचे डीपसीक मॉडेल लाँच करून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी स्पर्धा उभी केली आहे. आतापर्यंत अमेरिकेचा दबदबा असलेल्या या क्षेत्रात चीनने डीपसीकच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारत अमेरिकन कंपनी एनवाडियाला जोरदार हादरा दिला आहे. मुकेश अंबानींचे हे भाषण यासाठी देखील चर्चेत आहे कारण अंबानी भारतात एआय क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एनवाडिया या कंपनीसोबत एकत्रितपणे कार्यरत आहे. ते जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर बनवण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातच्या जामनगरमध्ये बनवला जाणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एनवाडिया एआय’ परिषदेच्या वेळी भारतात ‘एनवाडिया’ व रिलायन्सने एकत्रितपणे ‘एआय’ पायाभूत सुविधा तयार करण्याची घोषणा केली होती. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनवाडिया यांनी भारतात एआय सुपरकॉम्प्युटरचा विकास करण्यासाठी व देशातील वेगवेगळ्या भाषांवर भाषा मॉडेल बनवण्यासाठी करार करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ‘एनवाडिया’ने सांगितले होते की, रिलायन्सच्या एक गिगावॉट डेटा सेंटरसाठी आम्ही आमचे ब्लॅकवेल एआय प्रोसेसरचा पुरवठा करू. तेव्हा कंपनीचे प्रमुख हुंआंग यांनी अंबानी यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले की, भारताने स्वत:चा एआय बनवला पाहिजे. या एकूणच पार्श्वभूमीवर अंबानी यांनी जेव्हा विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, 'चॅटजीपीटीचा वापर करा मात्र स्वतःची वैचारिक क्षमता गमावू नका' तेव्हा या विषयी मोठी चर्चा होत आहे. तसेच एआय चांगले की वाईट याचीही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्यामुळेच अंबानींनी विद्यार्थ्यांना आणि तरुणाईला दिलेला संदेश खूप महत्त्वपूर्ण आहे.

logo
marathi.freepressjournal.in