Relationship Tips: पती पत्नीचे नातं हे एक अनोखं नातं असते. हे नातं फार नाजूक असते. या नात्यातील एक चूक फार महाग पडू शकते. जोडप्यातील एकानेही ही चूक केली तर सुस्थापित घर उद्ध्वस्त होते.पती-पत्नीच्या नात्यावर कुटुंबातील सुख-शांती अवलंबून असते. ज्या घरात हे नातं बरोबर नसते तिकडे लक्ष्मी वास करत नाही, असे म्हणतात. याचमुळे या नात्यात कधी दुरावा येऊ नये आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांनी काही सल्ले दिले आहे. या टिप्सला फॉलो करून तुम्ही तुमचे नाते आणखी सुधारू शकता.
पती-पत्नीने 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात
> आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे पार्टनर एकमेकांची काळजी घेत नाहीत, आदर नाही, ते नाते फक्त नावापुरतेच असते. असे नाते फसवणुकीने भरलेली असतात.
> नात्यात प्रेम नसेल तर पती-पत्नी दोघांपैकी कोणी तरी लग्नाबाहेर अवैध संबंध ठेवू शकतात आणि यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो.
> जेव्हा जोडीदार एकमेकांचा आदर करत नाहीत, तेव्हा ते प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांपासून लपवतात. नात्याचा पाया हा विश्वासावर असतो. त्यामुळे पती-पत्नीने प्रत्येक लहान-मोठी गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगावी. दोघांनी एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या तर हळूहळू या सगळ्या गोष्टींमुळे लग्न मोडते.
> आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जिथे लोक एकमेकांचा आदर करत नाहीत ते लग्न कधीही टिकत नाही.
> ज्या नात्यात आदर नाही तिथे प्रेमाचा प्रश्नच येत नाही. आदर नसलेल्या अशा विवाहाला काही अर्थ नाही.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही गृहीतके आणि सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)