Adventurous Sports In Uttarakhand: अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी आवडतात? उत्तराखंडमधील या ठिकाणांना आवर्जून भेट द्या!

Adventure Sports Activities: सुंदर निर्सग अनुभवण्यासाठी उत्तराखंडला भेट दिली जाते. पण याशिवाय तुम्ही तिकडे रॉक क्लाइंबिंगपासून ते व्हाइट रीफ राफ्टिंग आणि पक्षी निरीक्षणापर्यंत सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
Freepik
Freepik

Traveling Tips: उत्तराखंड हे असे पर्यटन स्थळ आहे जिथे वर्षभर पर्यटक येत असतात. येथे हिमालयाच्या दऱ्यांमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग, माउंटन क्लाइंबिंग यासारख्या अनेक साहसी क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता. या सुविधांमुळे येथे दरवर्षी पर्यटक येत असतात. उत्तराखंड हे सुंदर खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या कोलाहलापासून दूर येथे तुम्ही शांततेचे काही क्षण घालवू शकता. जर तुम्हाला साहसाची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. जर तुम्ही उत्तराखंडला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

पंगोटमध्ये कॅम्पिंगला जा

पंगोट हे नैनितालपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे. हे गाव प्रसिद्ध आहे. नैनितालच्या गर्दीपासून दूर शांततेचे काही क्षण घालवण्यासाठी ही जागा बेस्ट आहे. पंगोटकडे जाताना स्नो पीक आणि नैना पीकचा सुंदर नजारा दिसतो. पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे कारण इथे तुम्हाला पक्ष्यांच्या १५० हून अधिक प्रजाती पाहायला मिळतील. इथे तुम्ही ट्रेकिंग, माउंटन बाइकिंग, पक्षी निरीक्षण आणि कॅम्पिंग यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.

रॉक क्लाइंबिंगची मजा घ्या

मुक्तेश्वर हे नैनिताल जिल्ह्यातील २२८६ मीटर उंचीवर वसलेले डोंगराळ ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठीची मज्जा घेऊ शकता. तुम्ही आता इथे या अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता. पण तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी जाण्याचा विचार चुकूनही करू नका.अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी प्रसिद्ध असण्यासोबतच इथे एक प्राचीन मंदिर देखील आहे.

बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा घ्या आनंद

गंगेच्या काठावर वसलेले ऋषिकेश हे शहर कोणाला माहित नाही. ही अजग अनेक कारणांनी प्रसिद्ध हे. इथे तुम्ही अनेक अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी लोकप्रिय आहे. येथे तुम्ही रिव्हर राफ्टिंगपासून ते बंजी जंपिंगपर्यंत अनेक अ‍ॅक्टिव्हिटी करू शकता. इथे बंजी जंपिंग देखील लोकप्रिय आहे कारण हे देशातील सर्वात उंच व्यासपीठ आहे.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in