सांधेदुखीसह अजून कशासाठी आहे मोहरीचे तेल फायदेशीर? जाणून घ्या

मोहरीचे तेल हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे तेल आहे, विशेषतः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणा या राज्यांमध्ये याचा जास्त वापर होतो.
सांधेदुखीसह अजून कशासाठी आहे मोहरीचे तेल फायदेशीर? जाणून घ्या
फोटो सौ FPJ
Published on

तेलांचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा उपयोग आयुर्वेदिक उपचारासाठी केला जातो, जेणेकरून स्थानिक हवामानानुसार लोकांचे आरोग्य चांगले राहील. प्रत्येक भागात तिथल्या वातावरणाला योग्य असणारे तेल वापरले जाते. त्यामुळे एकदा मोहरीच्या तेलाचे आरोग्याला काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

मोहरीचे तेल हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे तेल आहे, विशेषतः उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणा या राज्यांमध्ये याचा जास्त वापर होतो. आहारात वेगवेगळ्या प्रकारे याचा समावेश केल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात.

फोटो सौ Free pIK

मोहरी तेलाविषयी अधिक माहिती

अनेक वर्षांपासून हे सोनेरी रंगाचे तेल भारतीय खाद्यसंस्कृतीचा भाग आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये, जसे की चरक संहिता, यामध्येही मोहरी तेलाचा उल्लेख आढळतो. धार्मिक विधींमध्येही त्याचा वापर केला जातो.

मोहरी तेल पारंपरिक पद्धतीने मोहरीच्या बियांपासून बनवले जाते. जुन्या काळातील कोल्ड-प्रेस पद्धत आजच्या आधुनिक पद्धतींपेक्षा अधिक फायदेशीर मानली जाते. याला खास चव आणि सुगंध असतो. याच कारणांमुळे आयुर्वेदामध्येही रोजच्या जीवनशैलीत मोहरी तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

फोटो सौ FPJ

मोहरी तेलाचे आरोग्यासाठी फायदे

रोगप्रतिकारशक्ती

मोहरी तेलाचे सर्वात मोठे फायदे म्हणजे तणाव आणि चिडचिड कमी करणे. यामध्ये झिंक, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला संसर्ग आणि आजारांपासून लढण्यास मदत करतात.

सांधेदुखी आणि त्वचेचे संसर्ग

मोहरी तेलाच्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसेच, यातील अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचेवरील संसर्ग कमी करण्यास मदत करतात.

फोटो सौ FPJ

हृदयाचे आरोग्य

मोहरी तेल तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये MUFA (मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड), ओमेगा-3 आणि कमी कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

केसांची देखभाल

मोहरी तेलाने केसांचे पोषण होते. यामुळे केस मजबूत होतात मदत होते, केस गळणे कमी होते आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

पचनाचे आरोग्य सुधारते

मोहरी तेलाचा स्वयंपाकात वापर केल्याने पचनाचे आरोग्य उत्तम होते. अन्न सहज पचल्याने पचनसंस्था मजबूत होते. निरोगी राहण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यासाठी मोहरी तेलाचा आहारात समावेश नक्की करा.

फोटो सौ Free pIK

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in