नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्या घरी बनवा लिप स्क्रब; ओठ होतील गुलाबी आणि मऊ

आपले ओठ गुलाबी, मऊ आणि सुंदर असावे असे कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला मऊ आणि गुलाबी ओठ आवडतात. मात्र, यासाठी महागडे उपचार किंवा ब्यूटी प्रोडक्ट्स विकत घेणं परवडत नाही. असे असेल तर ही माहिती तुमची खूप मोठी मदत करू शकते. तुम्ही घरच्या घरी ओठांसाठी नैसर्गिक पदार्थ वापरून स्क्रब (Natural Scrubs for Soft Lips) तयार करू शकता. या स्क्रबच्या नियमित वापराने तुमचे ओठ गुलाबी, मऊ आणि सुंदर होतील.
नैसर्गिक पदार्थ वापरून घरच्या घरी बनवा लिप स्क्रब; ओठ होतील गुलाबी आणि मऊ
Freepik
Published on

आपले ओठ गुलाबी, मऊ आणि सुंदर असावे असे कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला मऊ आणि गुलाबी ओठ आवडतात. मात्र, यासाठी महागडे उपचार किंवा ब्यूटी प्रोडक्ट्स विकत घेणं परवडत नाही. असे असेल तर ही माहिती तुमची खूप मोठी मदत करू शकते. तुम्ही घरच्या घरी ओठांसाठी नैसर्गिक पदार्थ वापरून स्क्रब (Natural Scrubs for Soft Lips) तयार करू शकता. या स्क्रबच्या नियमित वापराने तुमचे ओठ गुलाबी, मऊ आणि सुंदर होतील.

मध आणि साखर

साखर हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे ओठांवरील मृत त्वचा काढून टाकते, तर मधात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला पुढील साहित्य लागेल.

साहित्य-

१ चमचा साखर

१ चमचा मध

१/२ टीस्पून खोबरेल तेल

स्क्रब बनवण्याची पद्धत

एका छोट्या वाटीत साखर, मध आणि खोबरेल तेल योग्य प्रकारे मिसळून घ्या. तुमचा स्क्रब तयार आहे.

कसा उपयोग करणार

हे मिश्रण ओठांवर हलक्या गोलाकार हालचालीत २-३ मिनिटे मालिश करा. ते ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा वापरा.

कॉफी आणि मिल्क क्रीम स्क्रब

कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ओठांचा काळेपणा दूर करतात, तर दुधाची क्रीम ओठांना मऊ बनवते.

साहित्य-

१ टीस्पून कॉफी पावडर

१ टेबलस्पून मिल्क क्रीम

१ टीस्पून तपकिरी साखर

असा तयार करा स्क्रब

सर्व साहित्य मिसळा आणि पेस्ट बनवा.

कसा वापरणार?

या पेस्टने ओठांना किमान २ मिनिटे स्क्रबिंग करा. त्यानंतर १० मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोनदा हा स्क्रब वापरा.

गुलाब पाणी आणि बदाम तेलाचा स्क्रब

गुलाबपाणी ओठांना ताजेतवाने आणि मऊ करते, तर बदाम तेल पोषण देते.

साहित्य-

१ टीस्पून बदाम तेल

१ चमचा गुलाबजल

१ टीस्पून ओटमील पावडर

असा तयार करा स्क्रब

सर्व साहित्य मिसळा आणि पेस्ट बनवा.

असा वापर करा

ओठांना ३-४ मिनिटे मसाज करा. ५ मिनिटांनी धुवा. आठवड्यातून ३ वेळा ते लावा.

कोको पावडर आणि दही स्क्रब

कोको पावडरमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात आणि दही ओठांना मॉइश्चरायझ करते.

साहित्य-

१ टीस्पून कोको पावडर

१ टीस्पून दही

१/२ टीस्पून ऑलिव्ह ऑइल

बनवण्याची पद्धत-

सर्व साहित्य मिसळा आणि पेस्ट बनवा.

कसा उपयोग करणार?

ओठांवर २ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर १० मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोनदा या स्क्रबचा वापर करा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in