पैसे वाचवा...! चेहऱ्याची टॅनिंगपासून सुटका करण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

लाइकोपीन हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं आणि त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ही ठरतं.
पैसे वाचवा...! चेहऱ्याची टॅनिंगपासून सुटका करण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेला लाल टोमॅटो जेवणाची चव तर वाढवतोच, पण तुमच्या चेहऱ्यासाठी ही उत्तम प्रकारे काळजी घेतो. टोमॅटोमध्ये असणारे लाइकोपीन हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं आणि त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ही ठरतं. टोमॅटोचा वापर केल्याने त्वचेची पीएच पातळी स्थिर राहते आणि दीर्घकाळ सुरकुत्या पडण्याची समस्या येत नाही. टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. दिवसभरात एक टोमॅटो खायला तर हवाच, सोबत आठवड्यात एकदा तरी टोेमॅटो फेस मास्क चेहऱ्याला लावायला हवा. तर जाणून घ्या घरच्या घरी फेस स्क्रब कसा बनवायचा.

स्क्रबिंग

फेशियलच्या पहिल्या टप्प्यात क्लीनिंग केली जाते. यासाठी टोमॅटोचा लगदा आणि कच्चे दूध एकत्र करून कापसाच्या पॅडच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. टोमॅटो फेशियलच्या या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला चेहरा स्क्रब करावा लागेल. यासाठी अर्धा टोमॅटो घ्या, टोमॅटोच्या कापलेल्या भागावर साखर आणि कॉफी पावडर घाला आणि टोमॅटो आणि साखरेच्या स्क्रबने 5 मिनिटे चेहऱ्यावर हळू हळू मसाज करा. असे केल्याने त्वचेवरील मृत पेशी, टॅनिंग आणि काळे डाग दूर होतात. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

चेहऱ्यावर फेसपॅक लावा

स्क्रबिंग केल्यानंतर टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. असे केल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चमकते. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे टोमॅटो प्युरीमध्ये १ चमचे बेसन, २ चमचे दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चिमूट हळद घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे ठेवा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

फेस मास्क

चेहऱ्यावर फेस मास्क लावण्यासाठी टोमॅटोच्या कापांवर हळद लावा आणि 10 मिनिटे हलक्या हाताने फिरवत गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.

चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा

चेहऱ्यावर फेस मास्क लावल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका. यासाठी टोमॅटोच्या कापांवर कोरफडीचे जेल लावून 10 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. असे केल्याने चेहऱ्याची त्वचा हायड्रेटेड आणि ग्लोइंग देखील राहील.

logo
marathi.freepressjournal.in