
जीवनसत्त्वे अ, ब, क आणि के यांचा उत्तम स्रोत असलेले गाजर आणि जीवनसत्त्व अ, क, ई यांच्यासह ब१, ब२, ब६ यांचे मोठे भंडार असलेले कडुलिंब दोघांचेही एकत्रित सेवन केल्याने आरोग्याला मोठे फायदे होतात. याचे सर्वात जास्त फायदे डोळ्यांची दृष्टी, त्वचेचे विकार आणि पोटाच्या विकारात होतात. जाणून घ्या गाजराचा रस आणि कडुलिंबाचा रस एकत्रित करून पिण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे
गाजर आणि कडुलिंबाचा रस पिण्याची योग्य पद्धत
कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याचा रस तयार करावा. गाजर धुवून त्याचा रस तयार करावा. दोन मोठे चमचे कडुलिंबाच्या पानांचा रस आणि चार मोठे चमचे गाजराचा रस या प्रमाणात एकत्र करावे. हे सकाळी चहा, कॉफी तसेच दूध न घेता याचे सेवन करावे. याच्या सेवनानंतर किमान एक तास काहीही घेऊ नये.
आरोग्याला असे होतात फायदे
आतड्यांची स्वच्छता
आपल्या सर्वांनाच माहित आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आतड्याची स्वच्छता किती महत्त्वाची असते. कडुलिंबातील अँटीऑक्सीडेंट आतड्यातून विषारी द्रव्यांना बाहेर ढकलतात. यामुळे पोटाचे विकार होत नाहीत.
त्वचा उजळते
गाजर आणि कडुलिंबाच्या रसातील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेच्या कोशिकांना पोषक वातावरण तयार होते. तसेच रंग देखील साफ होतो. त्यामुळे त्वचेत निखार येतो आणि त्वचा चमकदार दिसते.
कोलेस्टेरॉल कमी करतो
गाजर आणि कडूलिंबाच्या रसातील फायबरमुळे रक्तात अतिरिक्त कोलेस्टरॉल जमा होत नाही. एक प्रकारे कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जाते.
डोळ्यांची दृष्टी सुधारते
गाजर आणि कडुलिंबाच्या रसात जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते. जीवनसत्त्व अ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
उत्तम भूक लागते
गाजर आणि कडुलिंबाच्या रसातील फ्लेवोनाइड्स या घटकामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच आतड्यांमधील विषारी घटकद्रव्य बाहेर पडल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. पचनशक्ती वाढल्यामुळे भूक चांगली लागते. शरीराचे पोषण वाढते.
केस मजबूत होतात
केसांच्या आरोग्यासाठी कडुलिंब हे अत्यंत फायदेशीर असते. अनादी काळापासून कडुलिंबाचा उपयोग केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केला जाते आहे. यामुळे रक्तशुद्धी होते. त्याचा फायदा त्वचा आणि केसांच्य आरोग्यासाठी होतो. कडुलिंबाच्या रसामुळे केस गळणे थांबते. केस मजबूत होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)