औषधांसोबत 'या' पदार्थांचे सेवन कधीच करू नका, होतील दुष्परिणाम

अ‍ॅलोपॅथी औषधे सुरू असताना काही पदार्थ आणि गोष्टी आवर्जून टाळायला हव्या. यासाठीच जाणून घ्या कोणते पदार्थ अथवा गोष्टी औषधोपचार सुरू असताना घेऊ नयेत..
औषधांसोबत 'या' पदार्थांचे सेवन कधीच करू नका, होतील दुष्परिणाम

आजारी पडल्यावर लवकर बरं होण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधे देतात. काही औषधे घेताना पथ्य पाणी पाळावे लागते. म्हणजे या औषधांसोबत इतर काही पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे औषधांचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. आजारपणातून बरे होण्यासाठी औषधपाण्यासोबत आहारातील पथ्ये खूप महत्त्वाची असतात. आयुर्वेदिक अथवा होमिओपॅथी औषधांसोबत डॉक्टर तुम्हाला काही पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात. पण अ‍ॅलोपॅथी औषधे सुरू असताना काही पदार्थ आणि गोष्टी आवर्जून टाळायला हव्या. यासाठीच जाणून घ्या कोणते पदार्थ अथवा गोष्टी औषधोपचार सुरू असताना घेऊ नयेत..

डेअरी प्रॉडक्ट्स

जर तुम्ही आजारपणासाठी अ‍ॅटि बायोटिक्स घेत असाल तर यासोबत डेअरी प्रॉडक्टस घेऊ नये. कारण दुधातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि प्रोटीन्स यांचे औषधांसोबत मिश्रण झाल्यास औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणूनच अ‍ॅटि बायोटिक्स घेत असाल तर त्यावेळी दुधाचे पदार्थ खाऊ नका.

पालेभाज्या 

पालेभाज्यांमध्ये जे घटक असतात त्यामुळे तुमच्या औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. कारण पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स भरपूर असतात. जर तुमच्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के असेल तर अशा भाज्यांसोबत वार्फारिनसारखी औषधे घेतल्यास उपचारांमध्ये बाधा येऊ शकते. हे औषध बऱ्याचदा ब्लीडिंग, रक्त गोठवणारे आजार यांसाठी दिले जाते. त्यामुळे हे औषष घेताना आहाराबाबत काळजी घ्या.

धुम्रपान- मद्यपान

औषधांसोबत मद्यपान अथवा धुम्रपान कधीच करू नये. कारण याचा दुष्परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. धुम्रपानामुळे फुफ्फुसे आणि मद्यपानामुळे यकृत खराब होण्याची शक्यता असते. औषधांसोबत व्यसने केल्यामुळे औषधांचा परिणाम तर कमी होतोच शिवाय तुमची रोग प्रतिकार शक्तीदेखील मंदावते. 

एनर्जी ड्रिंक्स

अनेकांना दररोज एनर्जी ड्रिंक्स घेण्याची सवय असते. पण जर तुम्ही औषधे घेत असाल तर त्यासोबत एनर्जी ड्रिंक घेणे टाळा. याचं कारण त्यामुळे तुमची औषधे शरीरात शोषून घेण्याची क्षमता कमी होते. ज्याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. 

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in