

अवघ्या दोन दिवसांतच २०२५ चे वर्ष संपून २०२६ ची सुरुवात होणार आहे. प्रत्येकालाच नवीन वर्षाची सुरुवात खास आणि अविस्मरणीय करायची असते. त्यातच फिरण्यासाठी जानेवारी महिना सर्वात बेस्ट मानला जातो. जर तुम्हालाही नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवायचा असेल, तर भारतातील या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या. येथील रोमँटिक वातावरण आणि मनमोहक दृश्ये तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील. चला तर जाणून घेऊया भारतातील या सुंदर ठिकाणांबद्दल.
पुद्दुचेरी
या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पुद्दुचेरीला भेट देऊ शकता. पुद्दुचेरी हे भारतातील केंद्रशासित प्रदेश आहे. येथे तुम्हाला फ्रेंच संस्कृती आणि हेरिटेज साइट्स पाहायला मिळतील. तसेच, येथील निळेशार अन् स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
उदयपूर
पार्टनरसोबत फिरण्यासाठी उदयपूर हे एक परफेक्ट ठिकाण आहे. लेक पिछोला आणि फतेह सागर तलाव ही येथील प्रसिद्ध ठिकाणं आहेत. तुम्ही येथे पॅडल बोटिंग, मोटरबोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच सूर्यास्ताच्या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, सिटी पॅलेस, सज्जनगड आणि जगदिश मंदिराला देखील भेट देऊ शकता.
मनाली
मनाली हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सुंदरता आणि मनमोहक दृश्ये तुमच्या मनाला भुरळ पाडतील. तुम्ही येथे रोहतांग पास, सोलंग व्हॅली, मॉल रोड आणि हडिंबा देवी मंदिराला भेट देऊ शकता. सोलंग व्हॅलीमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग, स्कीइंग आणि झोर्बिंगसारख्या अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करु शकता.
कूर्ग
कूर्गला 'भारताचे स्कॉटलंड'म्हणून ही ओळखले जाते. कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेले कूर्ग हे शांत,सुंदर आणि आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. कूर्गमध्ये तुम्हाला घनदाट जंगल, कॉफीचे मळे, निसर्गरम्य ठिकाणे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव मिळेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी नक्की जा.
मुन्नार
मुन्नार हे नैसर्गिक सुंदरतेने नटलेले ठिकाण आहे. तुम्ही येथे कॅम्पिंग, ट्रेकिंग, कॅम्पफायर आणि लाइव्ह म्यूझिकचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायचा असेल तर या ठिकाणी भेट द्यायला विसरु नका.