New Year 2026: नवीन वर्षाचा पहिला दिवस करा खास, 'या' शांत अन् सुंदर आध्यात्मिक ठिकाणांना द्या भेट

अवघ्या काही दिवसात २०२५ चे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्ष म्हणजे केवळ पार्टी, ट्रिप आणि जल्लोष नव्हे, तर स्वतःकडे वळून पाहण्याची, मन शांत करण्याची आणि नव्या संकल्पांसह नवीन सुरुवात करण्याची संधी असते. म्हणूनच, अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात.
नवीन वर्षाचा पहिला दिवस करा खास, 'या' शांत अन्  सुंदर आध्यात्मिक ठिकाणांना द्या भेट
नवीन वर्षाचा पहिला दिवस करा खास, 'या' शांत अन् सुंदर आध्यात्मिक ठिकाणांना द्या भेट
Published on

अवघ्या काही दिवसात २०२५ चे वर्ष संपून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्ष म्हणजे केवळ पार्टी, ट्रिप आणि जल्लोष नव्हे, तर स्वतःकडे वळून पाहण्याची, मन शांत करण्याची आणि नव्या संकल्पांसह नवीन सुरुवात करण्याची संधी असते. म्हणूनच, अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करतात. भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे श्रद्धा, निसर्ग आणि शांतता यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. तुम्हालाही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत २०२६ ची सुरुवात खास करायची असेल तर आध्यात्मिक शांती देणाऱ्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.

वाराणसी (उत्तरप्रदेश)

काशीमध्ये नववर्षाची सुरुवात करणे हा एक अतिशय सुंदर अनुभव ठरु शकतो. गंगा आरती, काशी विश्वनाथ मंदिर, प्राचीन घाट, घाटावरील मंत्रोच्चारांचा प्रतिध्वनी आणि पहाटेचा सूर्योदय येथील आध्यात्मिक वातावरणामुळे नववर्षाची सुरुवात खास होते. काशीमध्ये येणे म्हणजे केवळ उत्सव साजरा करणे नाही, तर एक आध्यात्मिक साधना आहे. येथे मन शांत होते, आत्म्याचे शुद्धीकरण होते.

अमृतसर (पंजाब)

या नववर्षात अमृतसरला भेट देणे हा देखील एक सुंदर अनुभव ठरू शकतो. सेवा आणि समानतेचा संदेश देणारे सुवर्ण मंदिर येथे श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरातील कीर्तन, गुरूंना आदरांजली आणि लंगर सेवा या साऱ्यातून भक्ती आणि सेवा यांचा सुंदर संगम दिसतो. जर सेवेच्या भावनेने नववर्षाची सुरुवात करायची असेल, तर अमृतसरला नक्की भेट द्या.

द्वारका (गुजरात)

गुजरातमधील द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. द्वारकाधीश मंदिर हे भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या नगरीत द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्याने मनाला शांती मिळते. येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला दर्शन घेणे शुभ मानले जाते. नवीन वर्षाची आध्यात्मिक सुरुवात करण्यासाठी द्वारका हे एक उत्तम ठिकाण आहे.

ऋषिकेश (उत्तराखंड)

उत्तराखंडमधील ऋषिकेश हे योग, ध्यान आणि गंगेच्या शांत वातावरणात नवीन वर्ष साजरा करण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला निसर्गरम्य दृश्य, शांत वातावरण आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळेल. हे शहर, त्रिवेणी घाटावर होणाऱ्या गंगा आरतीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरवण्यासाठी येथे नक्की भेट द्या.

logo
marathi.freepressjournal.in