
रिलायन्स फाऊंडेशच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे द फँटम ऑफ द ऑपेराच्या भव्य उद्घाटनात त्यांनी नेसलेली Mocha Saree पुन्हा एकदा फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट ठरत आहे. नीता अंबानी या त्यांच्या सुंदर साड्यांसाठी कायमच चर्चेत असतात. यंदाही त्यांच्या Mocha Saree ची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली Mocha Saree त्यांनी NMACC च्या द फँटम ऑफ द ऑपेरा प्रीमियरमध्ये नेसली होती. या साडीत त्यांचे सौंदर्य अप्रतिम दिसत होते. नीता अंबानी या आपल्या स्टाइलिश साड्यांमुळे कायमच सर्वांना प्रभावित करतात. त्यांच्या साडीला नाजूक चमकदार सिक्विन बॉर्डर होती. अत्युच्च दर्जाचे फॅब्रिक असलेली ही साडी अगदी सहज आणि आरामदायक वाटत होती. कोणत्याही साडीचे सौंदर्य हे साडी सोबत घातलेल्या ब्लाऊजमुळे अधिक खुलून दिसते. नीता अंबानी यांच्या या पोशाखात साडीपेक्षा ब्लाऊज जास्त उठून दिसत होता. पूर्ण बाहींचा असणारा नीता अंबानींचा ब्लाऊजवर आकर्षक भरतकाम केले होते. हे भरतकाम नाजूक क्रिस्टलने सजवलेले होते. त्यामुळे पोशाखाला एक वेगळीच उंची प्राप्त होत होती. नीता अंबानींच्या साडी ड्रेपिंग स्टाईलवर हा ब्लाऊज खूपच मॅच होत आहे.
पोशाखासोबत सिंपल बट लक्षवेधक हेअरस्टाईल
या पोशाखावर नीता अंबानींनी केलेली हेअरस्टाईल एकदम सिंपल पण आकर्षक, लक्षवेधक आणि त्यांचा आभा वाढवणारी वाटत होती. त्यांनी साडीवर छान अंबाड्याची हेअरस्टाईल केली होती. तर या साडीसोबत खूप हेवी ज्वेलरी न वापरता सुंदर स्टड इअररिंग्ज आणि काही अंगठ्या त्यांनी घातल्या होत्या.
कालातीत फॅशन भव्यता आणि आकर्षक शैली
सध्याच्या युगात एकीकडे बोल्ड सिक्विन्स आणि स्लीव्हलेस ब्लाउज फॅशन ट्रेंडवर वर्चस्व गाजवतात तिथे नीता अंबानी फूल बाह्यांच्या ब्लाऊजची निवड करतात. यातून त्यांचे वेगळेपण, कालातीत फॅशन, भव्यता आणि आकर्षक शैली स्पष्ट होते. तसेच उन्हाळी कार्यक्रमांसाठी त्यांचा हा पोशाख अगदीच एक परिपूर्ण प्रेरणादायी ठरतो.