Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे प्रकार, निदान आणि औषधोपचाराचे महत्व जाणून घ्या

World Brain Tumour Day 2024: मेंदू किंवा त्याच्या सभोवतालच्या भागातील पेशींची असामान्य वाढ म्हणजे ब्रेन ट्यूमर.
Brain Tumor: ब्रेन ट्यूमरचे प्रकार, निदान आणि औषधोपचाराचे महत्व जाणून घ्या
Freepik
Published on

Health Care: मेंदू किंवा त्याच्या सभोवतालच्या भागातील पेशींची असामान्य वाढ म्हणजे ब्रेन ट्यूमर. उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टिकवून ठेवण्यासाठी ब्रेन ट्यूमरचेवेळीच निदान आणि उपचार होणे महत्वाचे आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊयात न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाहआणि सात्यकी बॅनर्जी, कार्यकारी संचालक आणि गट मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रिविट्रॉन हेल्थकेअर यांच्याकडून...

प्रकार आणि लक्षणे

ब्रेन ट्यूमरचे वर्गीकरण तो कोणत्या पेशींपासून तयार होतो त्यानुसार केले जाते. प्राथमिक ब्रेन ट्यूमरची सुरूवात मेंदूमध्ये होते, तर दुय्यम (मेटास्टॅटिक) ब्रेन ट्यूमरच्या गाठी शरीराच्या इतर भागांतून पसरतात. ग्लिओमास, मेनिन्जिओमास, पिट्यूटरी एडेनोमास आणि मेडुलोब्लास्टोमास हे प्राथमिक ब्रेन ट्यूमरचे सर्वात सामान्य प्रकार आहेत. लक्षणे ट्यूमरचे स्थान, आकार आणि वाढीचा दर यावर अवलंबून असतात आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो, परंतु सामान्य लक्षणांमध्ये सतत डोकेदुखी, फेफरे येणे, दृष्टी किंवा ऐकण्याच्या समस्या, व्यक्तिमत्त्व किंवा वर्तनातील बदल आणि संतुलन किंवा समन्वय साधण्यात अडचण यांचा समावेश होतो.

वेळेवर निदान होण्याचे महत्व

ब्रेन ट्यूमरचे वेळेवर निदान होणे अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे.सर्वप्रथम वेळेवर निदान झाल्याने कमी त्रासदायक परंतु परिणामकारक असे वेगवेगळे उपचार करणे शक्य होते. उदाहरणार्थ छोटे आणि विशिष्ट स्थानापुरते मर्यादित ट्यूमर्स शस्त्रक्रिया करून किंवा टारगेटेड रेडीएशनच्या मदतीने काढून टाकता येतात,तर आकाराने मोठे किंवा त्रासदायक ट्यूमर्स साठी थोडे आक्रमक उपचार करणे आवश्यक असते ज्याचे मोठ्या प्रमाणात साइड इफेक्टस असू शकतात.

तसेच ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान झाल्याने ट्यूमर मुळे होऊ शकणारे गंभीर स्वरूपाचे न्यूरॉलॉजीकल नुकसान टाळले जाऊ शकते. मेंदू हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा अवयव आहे ट्यूमरच्या वाढीने त्याच्या आजूबाजूच्या भागांवर परिणाम होऊ शकतो आणि काही वेळा त्याने कधीही भरून काढता न येऊ शकणारे नुकसान संभवते. वेळीच निदान झाल्यास हे धोके कमी होतात आणि रुग्ण उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतो.

निदान आणि उपचार तंत्रातील प्रगती

एमआरआय, सीटी स्कॅन या सारख्या प्रगत तंत्रामुळे ब्रेन ट्यूमर त्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याच बरोबर नॉव्हेल बायोमार्कर्स आणि जेनेटिक प्रोफाइलिंग मुळे निदानातील अचूकता वाढली आहे ज्यामुळे अधिक वैयक्तिकृत उपचार योजना करणे शक्य होते. या आधुनिक तंत्रांमुळे डॉक्टर ट्यूमर असल्याचे निदान तर करतातच पण त्याच बरोबर त्यांना त्याची होणारी वाढ आणि वेळोवेळी उपचारांना तो कसा प्रतिसाद देतो यावर देखील लक्ष ठेवता येते.

ब्रेन ट्यूमरच्या उपचारात सामान्यतः शस्त्रक्रिया, रेडीएशन थेरपी आणि केमोथेरपी यांचा एकत्रित वापर केला जातो. इम्युनोथेरपी आणि टारगेटेड ड्रग थेरपी यासारख्या नवीन उपचारपद्धतींमुळे देखील रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसत आहे. हे उपचार ट्यूमर पेशींना लक्ष्य करून आपले काम करतात आणि निरोगी टिश्यूजना वाचवतात, त्यामुळे दुष्परिणाम कमी होऊन परिणामकारकता सुधारते.

ब्रेन ट्यूमरचे वेळीच निदान आणि उपचार यांचे महत्व कमी लेखून चालणार नाही. वेळेवर निदान झाल्यास परिणामकारक उपाय करता येण्याची शक्यता वाढून गंभीर न्यूरॉलॉजीकल नुकसान टाळणे एकूणच रोगनिदान सुधारणेशक्य होते. सातत्याने होत असलेली डायग्नोस्टिक तंत्र आणि उपचार पर्यायांमधील प्रगती या गंभीर आव्हानाचा सामना करणाऱ्या रूग्णांसाठी आणखी चांगल्या परिणामांचे आश्वासन देतात.

logo
marathi.freepressjournal.in