लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब...नाश्त्यात ओट्स खरोखर किती फायदेशीर?

हे आपल्या देशात पिकणारे अन्न नाही, त्यामधून किती पौष्टिक घटक मिळणार, असे प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतात.
लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब...नाश्त्यात ओट्स खरोखर किती फायदेशीर?
Canva
Published on

ओट्स डाएटमध्ये असावेत, घाईच्या वेळेला अतिशय आरोग्यदायी आणि पोटभरीचा असा हा पदार्थ आहे असे मानले जाते. मात्र हे आपल्या देशात पिकणारे अन्न नाही, त्यामधून किती पौष्टिक घटक मिळणार, असे प्रश्न वारंवार उपस्थित होताना दिसतात. घाईच्या वेळेला घराबाहेर पडताना सोबत न्यायला अतिशय पौष्टिक मानला जाणारा हा पदार्थ सोयीस्कर ठरू शकतो.

शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक ओट्समधून अगदी सहज मिळतात. हे केवळ सुपर फूडच नाही, तर विविध चविष्ट पदार्थ बनविण्यासाठीही ओट्स अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही ओट्सच्या सेवनाने करू शकता. ओट्समध्ये तुम्ही वेगवेगळे फळांचे तुकडेही मिसळू शकता. त्यामुळे आहारतज्ज्ञांकडून कायमच ओट्सला प्राधान्य दिले जाते.

आता या ओट्सचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूया...

आरोग्यासाठी पोषक : ओट्समध्ये योग्य प्रमाणात फायबर, खनिजे, प्रथिने आणि फॅट्स असतात. त्यामुळे आहारात ओटमीलचा समावेश अतिशय फायदेशीर ठरू शकतो. ओट्समध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडंट्सचे कार्य : ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याचा वाढलेला रक्तदाब कमी होण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यासाठीही ओट्स उपयुक्त ठरतात. तसेच ओट्समध्ये इतरही अनेक उत्तम गुणधर्म असल्यामुळे ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करण्यास उपयोग: शरीरातील कोलेस्ट्राॅलची पातळी कमी करण्यास ओट्सचा उपयोग होतो. याचा हृदयाशी निगडित विविध आजारांमध्येही तितकाच उपयोग होतो. यामुळे रक्तातील कोलेस्ट्राॅलची पातळी समतोल राहण्यास मदत होते. कोलेस्ट्राॅल कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी होतो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध उपाययोजना करतो. मात्र आहारातील ओट्सचा समावेशही लठ्ठपणा कमी करण्यास उपयोगी ठरतो. ओट्स घेतल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे सहाजिकच आहार कमी होतो.

logo
marathi.freepressjournal.in