डायटिंगवर आहात? मनुका खा,'सिंहकटी' मिळवा...

डायटिंग करताना खूपदा भूक लागते आणि खाण्यावर तर बंधने असतात. अशावेळी भिजवलेले मनुके खावेत.
डायटिंगवर आहात? मनुका खा,'सिंहकटी' मिळवा...

तुम्ही जर डायटिंग फॉलो करत असाल तर ही बातमी तु्मच्यासाठी खास आहे. कारण शरीराशी निगडीत समस्या घालवण्यासाठी लोकं डायटिंग फॉलो करतात. मात्र, डायटिंग बंद केल्यानंतर शरीर पूर्वस्थितीवर येते. बऱ्याचदा डायटिंगवर असताना भूक लागते आणि अशावेळी प्रश्न पडतो, काय खावं? या दोन्ही समस्येवर उपाय म्हणजे खाण्यामध्ये मनुक्यांचा वापर, डायटिंग करताना खूपदा भूक लागते आणि खाण्यावर तर बंधने असतात. अशावेळी भिजवलेले मनुके खावेत.

भिजवलेल्या मनुक्यांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत होते. वजन नियंत्रणात राहते. डायटिंगमध्ये काजू वगळता बदाम, पिस्ता आणि मनुका आवर्जून खावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करणे आणि एकूणच सडपातळ होणे या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत.

सिंहकटी म्हणजे बारीक किंवा सडपातळ कंबर. अनेक स्त्रीया यासाठी बरेच प्रयत्न, उपाय सतत करत असतात. पण, ही गोष्ट मनुका खाल्ल्याने साध्य होते. जाड माणूस डायटिंगने वजन कमी करतो, परंतु डायटिंग संपताच त्याचे वजन पुन्हा पूर्ववत होते. ते होऊ नये आणि पुन्हा स्थूलपणा येऊ नये यासाठी मनुके खाणे आवश्यक आहे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in